शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात संरक्षित ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ मासा जप्त; वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल

By संदीप आडनाईक | Updated: February 25, 2026 15:02 IST

Kolhapur Crime News: कोल्हापूर शहरात फुलेवाडी रिंग रोडवर बुधवारी संरक्षित व अत्यंत धोक्यात असलेला ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ (शास्त्रीय नाव मोबुला मोब्युलर) हा दुर्मिळ समुद्री मासा विक्रीसाठी आणल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार करवीर (कोल्हापूर) परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी तत्काळ छापा टाकून संबंधित मासा जप्त केला.

- संदीप आडनाईक
कोल्हापूर : शहरात फुलेवाडी रिंग रोडवर बुधवारी संरक्षित व अत्यंत धोक्यात असलेला ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ (शास्त्रीय नाव मोबुला मोब्युलर) हा दुर्मिळ समुद्री मासा विक्रीसाठी आणल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार करवीर (कोल्हापूर) परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी तत्काळ छापा टाकून संबंधित मासा जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मासा एका मासे विक्री करणाऱ्या कंपनीने  बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवला होता. या माशाला पाकड किंवा वागळ असे स्थानिक नावाने ओळखले जाते. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून हा मासा हस्तगत केला. हा मासा १३० किलो वजनाचा असून तो १३० रुपये किलो दराने विकण्यात येणार होता. यासंदर्भात माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वन विभागाने छापा टाकला. बुधवारी दुपारी एक वाजल्यानंतर हा मासा विकला जाणार होता. त्यापूर्वी तो लोकांना पाहायला ठेवला होता. वन विभागाने संबंधित व्यक्तीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संरक्षित वन्यजीवांची खरेदी-विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तत्काळ वनविभागाला कळवावी.या कारवाईमुळे बेकायदेशीर वन्यजीव व्यापारावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नामशेष होत चाललेली प्रजात
जागतिक स्तरावर विस्तृत प्रसार असला तरी या प्रजातीची संख्या विखुरलेली आहे. ही नामशेष होत चाललेली प्रजात असून काही भागांत, विशेषतः उत्तर-पश्चिम भूमध्य समुद्रात हवाई सर्वेक्षणानुसार सुमारे १२,७०० इतकी संख्या शिल्लक असल्याने आययुसीनच्या यादीत समाविष्ट आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Protected 'Spine Tail Devil Ray' Seized in Kolhapur; Case Filed

Web Summary : Forest officials in Kolhapur seized a protected 'Spine Tail Devil Ray' being illegally sold. The 130 kg ray, locally known as Pakad or Waghal, was to be sold for ₹130/kg. A case has been registered under the Wildlife Protection Act, 1972.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर