हुपरी : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे मद्यप्राशन करून उसाच्या फडानजीक झोपलेल्या शासू कऱ्याप्पा गौरकार (वय ३५) या ऊसतोड मजुराचा थंडीने गारठून मृत्यू झाला. तो कागलच्या शाहू साखर कारखान्यात मुकादमाकडे कामाला होता. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, शाहू कारखान्याकडे ऊसतोड करण्यासाठी पट्टणकोडोली येथे ऊसतोड मजुरांची टोळी कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून भीमा बापू सोळसे यांच्या रट्टेमळा येथे ऊसतोड सुरू आहे. शासू गौरकार हा भीमा सोळसे यांच्या जनावरांच्या गोट्यानजीक मद्यप्राशन करून झोपला होता. मद्यप्राशन केल्याने त्याला तेथेच सोडून सर्व ऊसतोड मजूर आपआपल्या पालाकडे निघून गेले होते. रात्रभर बिना अंथरुण-पांघरुण उघड्यावर पडल्याने त्याचा थंडीच्या कडाक्याने रात्री मृत्यू झाला. हा प्रकार ऊसतोड करण्यासाठी सर्व आल्यानंतर उघडकीस आला.
पट्टणकोडोलीत शेतमजुराचा गारठून मृत्यू
By admin | Updated: January 12, 2015 00:43 IST
मद्यप्राशन करून उसाच्या फडानजीक झोपलेल्या
पट्टणकोडोलीत शेतमजुराचा गारठून मृत्यू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}