शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

चित्रनगरीचे ‘चित्र’ पालटणार

By admin | Updated: January 10, 2015 00:21 IST

विकास दृष्टिक्षेपात : १७ कोटी ४ लाख मंजूर; ५ कोटी ४० लाखांचा निधी वर्ग

इंदुमती गणेश - कोल्हापुरातील चित्रपट व्यावसायिकांसाठी दिवास्वप्न बनून राहिलेल्या कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासाची चिन्हे आता दृष्टिक्षेपात येत आहेत. शासनाच्या सन २०१४-१५च्या अर्थसंकल्पात चित्रनगरीसाठी नऊ कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यांपैकी ५ कोटी ४० लाख रुपये विभागाकडे वर्ग झाले आहेत; तर कंपाउंडच्या उर्वरित कामाला आठ-दहा दिवसांत सुरुवात होणार आहे. याशिवाय चित्रनगरीसाठी आणखी १७ कोटी ४ लाखांचा निधी मंजूर झाला असून, तो वर्ग झाला की परिसरातील लोकेशन्स करण्यात येणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटना दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील फिल्मसिटीसोबतच कोल्हापूर चित्रनगरी सुसज्ज करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चित्रनगरीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. आंदोलनानंतर शासनाने कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासाचे आश्वासन दिले. त्या घटनेला आता दहा वर्षे झाली आहेत. या काळात सांस्कृतिक कार्यमंत्री बदलले, मुख्यमंत्री बदलले, आता सत्ताही बदलली; पण चित्रनगरीचे विदारक रूप काही बदलले नाही. तीन वर्षांपूर्वी शासनाच्या अर्थसंकल्पात १० कोटींच्या निधीची घोषणा झाली. त्यातील तीन कोटी रुपये कंपाउंडच्या बांधणीसाठी खर्च झाले.
आता सरकार बदलले असले तरी त्यामुळे चित्रनगरीच्या विकासकामांवर गंडांतर आलेले नाही. त्यामुळे सन २०१४-१५ सालासाठी तरतूद झालेल्या नऊ कोटींपैकी ५ कोटी ४० लाखांचा निधी वर्ग झाला आहे. चित्रनगरीच्या कंपाउंडचे काही काम शिल्लक राहिले आहे. त्याठिकाणी पाण्याचा प्रवाह असल्याने तिथे घडविलेला दगड चालत नाही. २० फूट उंचीचे बांधकाम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध झालेली निविदा ठेकेदाराला मंजूर करण्यात आली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत कंपाउंडचे काम सुरू होईल, असे चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी सांगितले.

शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यांमुळे चित्रनगरीच्या मंजूर निधीपैकी काही निधी खात्यावर वर्ग झाला आहे. त्यातून कंपाउंडच्या कामासोबतच लोकेशन्सच्याही कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. चित्रनगरीच्या सुसज्जतेसाठी नव्याने आराखडा बनविण्यात आला असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन मंजूर १७ कोटींमध्ये विकासकामांना सुरुवात होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूरची चित्रपट परंपरा आणि येथील चित्रनगरीची गरज पाहता कोल्हापूरला वगळून मुंबईतील चित्रनगरीचा विकास करता येणार नाही. हा विकास लवकरात लवकर व्हावा यासाठी आम्हीही शासनाकडे बैठकीची वेळ मागितली आहे. महामंडळालादेखील या सगळ्या विकास प्रक्रियेत विश्वासात घेतले जावे, ही आमची अपेक्षा आहे.
- विजय पाटकर, अध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ