शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026:..तर निधी भ्रष्टाचारामध्ये फस्त होऊन जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:19 IST

इचलकरंजीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभानिमित्त विजयी संकल्प यात्रा

इचलकरंजी : केंद्र सरकारकडुन ७० वर्षे शहरांच्या विकासासाठी निधी येत नव्हता मात्र आता मोदी सरकारकडुन विविध योजनांच्या माध्यमातून शहरांना निधी दिला जात आहे. त्यातूनच विकास होताना दिसत आहे. भविष्यातही सरकारकडुन निधी येईल पण येणार्‍या निधीचा योग्य विनियोग होणे गरजेचे आहे. तो चुकीच्या हातात पडला तर भ्रष्टाचारामध्ये फस्त होऊन जाईल, असे टीकास्त्र मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोडले. तसेच इचलकरंजी महापालिका निवडणुकीत तुम्ही आमची काळजी घ्या पुढे ५ वर्षे आम्ही तुमची काळजी घेतो, असे आवाहनही त्यांनी केले.

इचलकरंजी येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभानिमित्त झालेल्या विजयी संकल्प यात्रेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजर्षी शाहु पुतळ्यापासून या यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर एका जीपमध्ये तर महायुतीचे सर्व उमेदवार एका टेम्पोत होते. जनसमुदाया सोबत मुख्यमार्गावरून ही यात्रा शिवतीर्थमार्गे महात्मा गांधी पुतळा चौकात पोहचल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वाचा : भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती

फडणवीस म्हणाले, इचलकरंजीतील घराघरात नळाने पाणी देऊन शहराचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवणार आहोत. रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्यासह विविध कामांसाठी निधी दिला आहे. या पुढेही दिला जाईल. शहराच्या सर्वांगिण विकासाठी महायुतीचं सरकार प्रयत्नशिल आहे. आम्ही ही निवडणुक, केलेल्या विकास कामाच्या जोरावरच लढवत आहोत. भविष्यातील शहरी विकासाचा आराखडा तयार आहे. तो घेऊनच आम्ही या महानगरपालिका निवडणूकांना सामोरे जात आहोत. त्यासाठी आम्हाला साथ द्या. असे आवाहन केले.

वाचा : 'शिव-शाहू'च्या उमेदवारांना माघारीसाठी ४० लाखांची ऑफर; शशांक बावचकर यांचा आरोप

परिसर भगवामय

 भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे स्कार्फ यामुळे संपूर्ण परिसर भगवामय होऊन गेला होता. ढोल-ताशांचा कडकडाट, झांजपथकाचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मुख्य मार्गावरुन ही रॅली निघाली. श्री शिवतीर्थ आणि श्री शंभुतीर्थ याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis Warns Against Corruption if Opposition Wins Ichalkaranji Election

Web Summary : Devendra Fadnavis urged Ichalkaranji voters to support the ruling coalition, promising development funds. He cautioned that electing the opposition would lead to corruption and misuse of funds. He pledged to solve the water issue and boost development if they win.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी