शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणाचे १२ तालुक्यांत २४ रंग; कुणी दिली पक्षाला सोडचिठ्ठी, कुणाची विरोधकांनाच मिठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:23 IST

मतदारही संभ्रमात, आजरा, गडहिंग्लज, चंदगडमध्येही वेगळे वातावरण

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी यंदा बाराही तालुक्यात राजकारणाचे बारा रंग पहावयास मिळत आहेत. ग्रामीण भागातील राजकारणाचा पोतच या निवडणुकीने बदलल्याचे दिसून येत असून पारंपरिक राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे.

हातकणंगले तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समितीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट दुरंगी सामना होत आहे. तर एका ठिकाणी शिंदेसेनेच्या बंडखोराने घाम फोडला असून दुसरीकडे महायुतीमधील भाजपनेच जनसुराज्यच्याविरोधात उमेदवार दिला आहे.

करवीर तालुक्यात महायुतीत जागा वाटपावरून फूट पडली तर महाविकास आघाडीत काँग्रेसने आघाडीतील कोणत्याही इतर पक्षाला उमेदवारी दिलेली नाही. करवीर विधानसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्र आले असून शिंदेसेना स्वतंत्र लढत आहे. महायुतीमध्ये बिघाड झाल्याने भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले तर शिंदेसेना स्वतंत्र लढत आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत आहे.

शाहूवाडी तालुक्यात चार जिल्हा परिषद गटात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत काट्याची लढत होत आहे. तर दोन गटात भाजपने पहिल्यांदाच उमेदवार उभे केले आहेत. जनसुराज्य विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अशीही लढत येथे आहे.

राधानगरी तालुक्यात काँग्रेस एकसंघ असून विरोधात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे सर्वच नेत्यांचा कस लागणार आहे. भुदरगडमध्ये दुरंगी लढतीचा थरार पहावयास मिळत असून दोन्ही काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना, भाजप या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

पन्हाळा तालुक्यात सोयीच्या राजकारणाने पारंपरिक निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. एका ठिकाणी जनसुराज्यचा अपक्षाला पाठिंबा तर दुसरीकडे शिंदेसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला महत्व असलेल्या कागल तालुक्यात प्रमुख चार गट सक्रिय आहेत. एकूणच तालुक्यात हसन मुश्रीफ, दोन घाटगे विरुद्ध मंडलिक असाच सामना होत आहे. शिरोळ नगरपालिकेपासून सुरू झालेला संघर्ष आता जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचला आहे.

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासमोर मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच मोठे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे, काँग्रेस, उद्धवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र भक्कम मोट बांधली आहे. तालुक्यातील सर्वच मतदारसंघांत आता टोकदार तिरंगी सामने पाहायला मिळत आहेत. गगनबावडा तालुक्यात काँग्रेसविरोधात महायुती असे थेट लढत आहे.

आजरा, गडहिंग्लज, चंदगडमध्येही वेगळे वातावरण

आजरा तालुक्यातील उत्तुर गटात महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचा प्रयोग होत आहे. या निमित्ताने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आजरा तालुक्यात मोर्चेबांधणी केली असून राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केले आहे. गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीविरोधात जनता दलाने भाजपमध्ये विलीनीकरण झाले असून चंदगडमध्ये भाजपने काँग्रेसचा एक गट फोडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad Politics: Shifting Alliances and Multi-Cornered Fights Emerge

Web Summary : Kolhapur Zilla Parishad elections witness shifting alliances, creating multi-cornered fights. Factions emerge over party lines in several talukas, challenging traditional political equations. The MahaYuti and MahaVikas Aghadi face internal conflicts, with BJP, Shiv Sena, and Congress vying for dominance, resulting in complex electoral battles.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी