शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या मेहरून नाकाडे ‘तंटामुक्त’मध्ये राज्यात प्रथम

By admin | Updated: December 29, 2016 23:02 IST

वृत्तांकनाची दखल : अडीच लाखांचा पुरस्कार

गारगोटी : एकतीस डिसेंबर रोजी भुदरगड किल्ल्यावर मद्यपींना मज्जाव करण्यासाठी किल्ले भुदरगड प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे मशाल गस्त घालण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक व कलनाकवाडीचे सरपंच रविराज निंबाळकर यांनी दिली. या अभियानात भुदरगड तहसील विभाग, पोलिस, वनविभाग, समस्त गडकरी व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सहभागी होणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली भुदरगड भूमी व त्यामध्ये गडकिल्ल्यांचे वैभव लाभलेला भुदरगड किल्ला सर्वत्र परिचित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गडाच्या माथ्यावर चारचाकी वाहने जाऊ शकणारा एकमेव असा हा गड आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेला, भल्या मोठ्या प्रमाणावर तलावात पाणी उपलब्ध असणारा हा किल्ला आहे. इथल्या पाण्याला अवीट गोडी आहे. कारण हे पाणी संपूर्णत: प्रदूषणमुक्त आहे. अशा या गडावर नववर्षाचे स्वागत करण्याचे निमित्त करून अनेक हौशी पर्यटक येतात. भरपूर दारू पिऊन डीजे लावून रात्रभर धिंगाणा घालतात, पण गेल्या काही वर्षांपासून किल्ले भुदरगड प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी रात्री मशालीच्या उजेडात गस्त घालण्याचे ठरविले. त्याला पोलिस, वनविभागाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर गडावर गस्त सुरू झाली. शाकाहारी जेवण करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत; परंतु नशा करून मांसाहार करण्यावर कडक निर्बंध आहेत. सध्या या मोहिमेत आजूबाजूला गडावर राहणाऱ्या गडकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दिवसेंदिवस लोकजागृती झाल्यामुळे मद्यपींनी गडाकडे पाठ फिरवली आहे.सध्या परिस्थिती पाहता हे गडकिल्ले म्हणजे मद्यपींना मेजवानी करण्याचे अड्डे बनत चालले आहेत. कोणतीही शासकीय सुटी असो किंवा ३१ डिसेंबर, या गडकिल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ माजविणाऱ्यांचे प्रस्थ वाढत चालले होते. यातून गडांची नासधूस होत असून दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, पेपर यांचा खच पडलेला असतो. यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. त्यामुळे किल्ल्यांचे वैभव नष्ट होत आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी पोलिस व वनविभागाच्या कार्यालयातर्फे या मद्यपींवर तसेच गडांवर चालणाऱ्या पार्टीवर बंधन घालण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून असे गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गडकऱ्यांकडून अशा महाभागांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. (प्रतिनिधी)इतिहासाला काळिमा फासण्याचे कृत्य करू नयेइतिहास संशोधक रविराज निंबाळकर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी रक्त सांडून गडकोटांचे साम्राज्य उभे केले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही इतका देदीप्यमान इतिहास पहायला मिळत नाही. आपल्या गैरवर्तणुकीमुळे इतिहासाला काळिमा फासेल, असे गैरकृत्य कोणीही करू नये. कारण आपल्या इतिहासाचे पावित्र्य नष्ट होऊ नये. १८४४ साली स्वातंत्र्यसंग्रामातील पहिली तोफ याच गडावरून डागली होती, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.