शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नरगेवाडीतील सख्खा भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: March 9, 2017 18:52 IST

गवत कापण्याच्या कारणावरुन वादातून प्रकार

नरगेवाडीतील सख्खा भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षागवत कापण्याच्या कारणावरुन वादातून प्रकारकोल्हापूर : नरगेवाडी (ता. करवीर) येथे गवत कापण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून सख्या भावाचा कुऱ्हाड, खुरप्याने व काठ्याने खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी सुनावली. मधुकर बापू कराळे (वय ४५) असे जन्मठेप झालेल्याचे नांव आहेत.या खटल्याची पार्श्वभूमी अशी , नरगेवाडी येथे दगडू बापू कराळे (वय ६०) व त्यांचा सख्खा भाऊ मधुकर बापू कराळे यांची एकत्र जमीन आहे. या जमिनीत गवताच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होता. दोन डिसेंबर २०१३ ला दगडू कराळे यांना मधुकर कराळे, त्याची पत्नी रंजना, निलेश व त्याचा भाऊ असे चौघांजणांनी गवत कापण्याच्या कारणावरुन रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भांडणे काढली. त्यावेळी रंजनाच्या हातात चटणीच्या पाण्याचे पातेले व खुरपे आणि निलेश व त्याच्या भावाकडे काठ्या होत्या. मधुकरने दगडू कराळे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. पण, त्यांनी तो डाव्या हाताने आडविला. त्यानंतर ही झोंबाझोंबी गावातील मुख्य रस्त्यावर आली. त्याठिकाणी दगडाचा ढिग पडला होता. याचवेळी मधूकरने दगडू कराळे यांच्या छातीवर कुऱ्हाडीने वार केला तर रंजनाने डोक्यावर खुरपे मारले. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेले दगडू कराळे यांची सुभाष व प्रकाश व त्यांची आजी यांना मारहाण केली. या ठिकाणी असलेल्या गणपती सदाशिव सावंत, कृष्णात सावंत, गोविंद सावंत व इतर लोकांनी भांडणे सोडवून जखमी झालेले दगडू कराळे यांना सीपीआरला उपचारासाठी आणले. याठिकाणी दगडू कराळे यांचा मृत्यु झाला.याबाबत दगडू यांचा मुलगा सुभाष कराळे यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानूसार मधुकर कराळे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अवचट यांनी दगडू कराळे यांच्या खून प्रकरणी मधुकर कराळेला जन्मठेपेचे शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर मधुकरची पत्नी रंजनी (वय ३५) व मुलगा निलेश उर्फ सरदार मधुकर कराळे (२७ दोघे राहणार नरगेवाडी) या दोघांना ३२५ कलमाखाली दोषी ठरवून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व अटकेपासून भोगत असलेली कैदीची शिक्षा सुनावली.या खटल्यात १५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्ष घटना पाहणारे सुभाष कराळे यांचा भाऊ प्रकाश, शेजारील कृष्णा सावंत, तपासी अधिकारी संभाजी गायकवाड, गजेंद्र पालवे, अंजुम शेख यांची साक्ष ग्राह्य आणि सरकारी वकील अ‍ॅड. अशोक रणदिवे यांच्या तक्रारी ग्राह्य मानून अवचट यांनी शिक्षा सुनावली.