शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसकामगारांचा वाहतूकदारांना लाखोंचा गंडा

By admin | Updated: January 12, 2015 00:36 IST

कारवाईची गरज : शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील अनेकांना फटका

दानोळी : शिरोळ-हातकणंगले तालुक्यांच्या परीक्षेत्रातील साखर कारखान्यांच्या चारशे ते पाचशे ऊस वाहतूकदारांची ऊसतोडणी कामगारांनी फसवणूक करून कोट्यवधी रुपये बुडविले आहेत. दरवर्षी होणाऱ्या अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कारखानदारांनी व शासनाने दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात वाहतूकदारांच्या व्यवसायास मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तालुक्यांतील प्रत्येक कारखान्याच्या पन्नास ते सव्वाशे ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्यांनी वाहतूकदारांची फसवणूक केली आहे. प्रत्येक टोळीस किमान सात लाख रुपये अ‍ॅडव्हान्स याप्रमाणे न आलेल्या टोळींचा उचलीचा आकडा कोट्यवधी रुपयांवर जातो. या फसवणुकीचा फटका वाहतूकदारांसह कारखान्याच्या यंत्रणेलाही बसला असून यावर्षीचा हंगाम संथगतीने सुरू आहे.
अनेक वर्षांपासून ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार यांच्यातील व्यवहार हा एकमेकांवरील विश्वासावर अवलंबून आहे; परंतु वाढत्या फसवणुकीच्या प्रकारामुळे या विश्वासाला तडा जात आहे. असा प्रकार नवीन नसून दरवर्षी घडत असल्यामुळे यापुढे व्यवहार कसा करायचा व त्यांच्यावर कितपत भरोसा ठेवायचा हा प्रश्न पडला आहे.
आतापर्यंत अनेकवेळा फसवणुकीचा प्रकार घडून देखील वाहतूकदार नव्या जोमाने, नवी दुसरी टोळी तयार करून आपला व्यवसाय करत आहेत. पण ऐनवेळी कामगार मिळणे शक्य नसल्यामुळे त्यांची वहाने बसून आहेत. दिलेला अ‍ॅडव्हान्स मिळेल की नाही याबाबत शंका आहे. शिवाय चालू हंगामातील व्यवसायही बुडाला, असा दुहेरी आर्थिक फटका वाहतूकदारांना बसला आहे.
कारखानदारी ही वाहतूकदार, ऊसतोडणी कामगार व ऊस उत्पादक अशा एकमेकांवर अवलंबून आहे; परंतु कारखानदार हे फक्त वाहतूकदारांना करारबद्ध करतात. मात्र, वाहतूकदारांच्या अडचणी व संकटांशी कारखानदार काहीच देणंघेणं ठेवत नाहीत. अशाप्रकाराबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णायक तोडगा काढण्याची गरज आहे. ( प्रतिनिधी )