शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनचा ‘आयसाेलेशन’कडे तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोविड- १९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने गेल्या वर्षभरात चांगल्या पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोविड- १९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने गेल्या वर्षभरात चांगल्या पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण केल्या ; परंतु गंभीर रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठाच होत नसल्यामुळे आरोग्य प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाइकांची चांगलीच धावपळ उडत आहे.

गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा कोल्हापूर शहरात सर्वाधिक कोविड रुग्ण आढळून आले. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोविड विषाणूवर नेमके औषध नसल्याने गंभीर तसेच अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यास सुरुवात झाली. एका रुग्णाला सहा इंजेक्शन दिली जातात. त्याची किंमतही जास्त असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना ती घेणे अशक्य होत आहे. रुग्णसंख्या जशी वाढेल तसा या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याने तर सर्वसामान्य जास्तच हैराण झाले.

त्यातून मार्ग काढत टास्क फोर्सच्या सूचनेनुसार राज्य सरकार स्वत: पुढाकार घेऊन हे इंजेक्शन मोफत देऊ लागले. सुरुवातीला ती मिळाली; परंतु आता राज्यभरात कोविड रुग्णांचा विस्फोट झाल्याने रेमडेसिविर मिळण्यात अडचणी आल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांची अडवणूक व त्यातून पुढे आर्थिक लुबाडणूक करणे सुरू झाले आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर झाला आहे.

खुल्या बाजारात या इंजेक्शनचा तुटवडा आजही आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात हे इंजेक्शन आवश्यक असलेल्या रुग्णांना मोफत दिले जाते; पण मागणीपेक्षा पुरवठा फारच कमी असल्याने तेथे उपचार करताना अडचणी येत आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्णांचे नातेवाईकही वैतागले आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्केच पुरवठा होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी नोंदविण्यात आली आहे; परंतु ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. कधी इंजेक्शन मिळणार याचीही नेमकी माहिती कोणाला नाही. रुग्णांच्या नातेवाइकांना ती बाहेरून आणण्यास सांगितले जात आहे.

१. रेमडेसिविरची मागणी व पुरवठा-

(दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत)

मागणी केली - ३००० व्हाइल्स

पुरवठा झाला - ६८० व्हाइल्स२.

( दि. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ साठी)

- मागणी- ४००० व्हाइल्स,

- आतापर्यंत पुरवठा केवळ - ४२