शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोकण’ एस.टी. ‘सीबीएस’मधून सोडा

By admin | Updated: January 13, 2015 00:51 IST

चंद्रकांतदादांची सूचना : निर्णय स्वागतार्ह - नीतेश राणे

कोल्हापूर : संभाजीनगर येथून कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या एस. टी. बसेस पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकातून (सीबीएस) सोडण्याच्या सूचना आज, सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ताराबाई पार्क येथील सर्किट हाऊस येथे ही बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजाराम माने उपस्थित होते.
शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एक जानेवारीपासून कोकणातील एस. टी. संभाजीनगर येथून सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये मालवण, सावंतवाडी, पणजी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, राधानगरी, देवगड, गगनबावडा डेपोच्या गाड्या, विजयदुर्ग या प्रमुख गाड्यांतील प्रवाशांना शहरात येण्यासाठी संभाजीनगर येथे उतरावे लागत होते. येथून शहरात येण्यासाठी प्रवाशांना १० रुपये ते ८० रुपये आर्थिक भुर्दंड बसत होता. त्यामुळे हा निर्णय बदलावा अन्यथा १५ जानेवारीपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला होता. त्याचबरोबर अनेक प्रवासीही हा निर्णय बदला, अशी मागणी करत होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी आज महामंडळाचे कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेत पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक येथून गाड्या सोडाव्यात, अशा सूचना दिल्या. त्यामुळे कोकणातील दहा गाड्या आता संभाजीनगर बसस्थानक येथे न थांबता मध्यवर्ती बसस्थानक येथे येतील, पुन्हा येथूनच कोकणात जातील. या गाड्या संभाजीनगर बसस्थानक ावरून रिंगरोड, सायबर चौक, विद्यापीठ कॉर्नर, मिलिटरी कँटिन, रेल्वे फाटक, ताराराणी चौकामार्गे मध्यवर्ती बसस्थानकात येतील व याच मार्गने पुन्हा संभाजीनगर स्टँड येथून कोकणात जातील. बैठकीस विभाग नियंत्रक सुहास जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी पी. व्ही. पाऊसकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)


सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर येथे जाणाऱ्या एस.टी. गाड्या पुन्हा मुख्य बसस्थानकात नेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. येथील जनतेच्या हितासाठी आंदोलन करण्याबरोबरच कोणत्याही स्तरावर जाण्याची आपली तयारी आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी या समस्येबाबत आपण सोमवारी बोललो होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेवर होणारा अन्याय कधीही खपवून घेणार नाही. इतर जिल्ह्यातील जनतेला जो न्याय दिला जाईल, तोच न्याय येथील जनतेला मिळायला हवा. भविष्यात यासाठी आपण आग्रही राहणार आहे.
- नीतेश राणे, आमदार