शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 8:35 PM

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

Kolhapur Lok Sabha Election 2024 :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील टीकेवरुन आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. " अजून १४ दिवस आहेत, बंटी पाटील गप्प बसणार नाही. तुम्ही बंटी पाटलावर टीका करा हा पाटील तुम्हाला समर्थपणे उत्तर द्यायला तयार आहे. मात्र शाहू महाराजांची अस्मिता आहे. तुम्ही त्यांना चॅलेंज केलं आहे की विकासाच्या कामावर गप्पा मारायला समोर यावं. पण कशाला त्यांना तुम्ही विनंती करता मी यायला तयार आहे. पाच वर्षात तुम्ही काय केलं आणि पाच वर्षात कोल्हापूरचं काय नुकसान झालं हे सांगायला मी तयार आहे. शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वाची साक्ष तुम्ही मागता म्हणजे तुम्ही किती कृतघ्न आहात अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर टीका केली, या टीकेला मंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्युत्तर दिले. 

मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. संपूर्ण राजकारणाला कलाटणी मिळणारी सभा असणार आहे. 'काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीचे राजकारण केले आहे त्यामुळे हा प्रकार सुरू आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला त्यांचं समर्थन करणाऱ्या ओवेसी यांनी यांना पाठिंबा दिला.  ही शोकांतिका आहे मला यावर काही बोलायच नाही. कोल्हापूरात उद्रेक झाला त्यानंतर त्यांनी पाठिंबा नाकारला आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.

"वंचितनेही यांना पाठिंबा दिली, वंचितच्या छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवाराने औरंगजेबाच्या कबरीवर डोक ठेवलं. यामुळे हे काँग्रेसच हे षडयंत्र आहे. महाराजांचा अपमान  व्हायला काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोपही उदय सामंत यांनी केला. अशा वयामध्ये त्यांना राजकारणात राजकीय रणांगणात आणणे माझ्या दृष्टीने काँग्रेसची फार मोठी चूक आहे. काँग्रेसला हे घराण आमच्याकडे आहे हे दाखवायचं असेल. छत्रपती शाहू महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे, असंही उदय सामंत म्हणाले. 

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरUday Samantउदय सामंतSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४