मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 07:34 PM2024-04-25T19:34:39+5:302024-04-25T19:38:08+5:30

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

lok sabha election 2024 Varsha Gaikwad announced candidature from Mumbai North Central | मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, महाविकास आघाडीने  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे.  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे. 

“शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन तिढा सुरू असल्याची चर्चा सुरू होती. यात मुंबई आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होती. काँग्रेसच्या वर्षा गायकवाडही उमेदवारीवरुन नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आता वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

Web Title: lok sabha election 2024 Varsha Gaikwad announced candidature from Mumbai North Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.