शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक-गोव्यातील पाणीप्रश्न पेटला

By admin | Updated: August 27, 2015 00:44 IST

हुबळी, धारवाडमध्ये बंद : दगडफेक, गोव्याची बस जाळली

बेळगाव : जिल्ह्यातील खानापूर इथल्या कणकुंबी येथील कळसा व भांडुरा योजनेचे पाणी हुबळी, धारवाडसह उत्तर कर्नाटकला मिळावे, या मागणीसाठी बुधवारी पुकारलेल्या हुबळी आणि धारवाड बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून, अनेक ठिकाणी दगडफेक तसेच रास्ता रोकोही करण्यात आला आहे. खानापूर येथे कर्नाटक-गोवा सीमेवरील कळसा भांडुरा प्रकल्पाच्या म्हादई नदीच्या पाण्यावरून कर्नाटक, गोवा पाणी तंटा पुन्हा एकदा पेटला असून, धारवाड, हुबळी जिल्ह्यांत आंदोलन संतप्त झाले आहे. काल रात्री आंदोलकांनी धारवाड येथे गोवा परिवहन मंडळाची बस जाळली, तर बुधवारी धारवाड, हुबळी बंदची हाक दिली होती. बुधवारी हुबळी येथे जुने व नवीन बसस्थानक रिकामे होते, तर दोन्ही शहरांतील सरकारी कार्यालये, शिक्षण संस्थादेखील बंद होत्या. कळसा, भांडुरा नाल्यांना म्हादई नदीला जोडून उत्तर कर्नाटकास पाणी मिळावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. या शिष्टमंडळास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे हे आंदोलन तीव्र झाले. मंगळवारी रात्री हुबळीत गोवा परिवहन मंडळाच्या बसला आग लावली, तर केशापूर बस आगारात गोव्याच्या चार व कर्नाटकच्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. कर्नाटक चेंबर आॅफ कॉमर्स हुबळीचे अध्यक्ष वसंत लदवा, सचिव सिद्धेश्वर कम्मार, माजी मंत्री बसवराज होरट्टी, विकास सोप्पिन, राजण्णा कोरवी, आदींनी हुबळी कित्तूर चन्नम्मा चौकात निदर्शने केली. कर्नाटक चेंबर आॅफ कॉमर्स, हुबळी, कलसा भांडुरा आंदोलन केंद्र समिती, रयत संघ, अधिवक्ता संघ, कर्नाटक रक्षणा वेदिके, आॅटो रिक्षा चालक संघ, मैक्सिकॅब संघ, हॉटेल मालक संघ, एआईटीयूसी, स्विमिंगपूर कॉप्लेक्स व्यापारी, तसेच संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला होता. दरम्यान, कमी पाऊस झाल्याने धारवाड, हुबळी, बागलकोटमधील शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यासाठी हे पाणी कर्नाटकला द्यावे, या मागणीसाठी धारवाड जिल्हा बंदची हाक दिली होती. नवलगुंद, धारवाडला धर्मगुरूंसह स्वामी, वकील व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. काय आहे वाद...खानापूरमधील म्हादई नदीचे नैसर्गिकरीत्या गोव्याकडे वाहणारे पाणी कळसा-भांडुरा प्रकल्पातून उत्तर कर्नाटकातील हुबळी, धारवाड, बागलकोटकडे वळविण्याच्या योजनेस गोवा सरकारचा आक्षेप आहे. गोवा सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून, सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या लवादाने या प्रकल्पास स्थगिती दिली आहे. गोवा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून ही समस्या सोडविण्याची मागणी कर्नाटकातील आंदोलकांनी केली आहे.