शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जयंत नारळीकरांचे महाद्वार रोडवर होते घर, हुजूरबाजार परिवार आजोळ; कोल्हापूरकरांनी जागवल्या आठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:10 IST

कोल्हापूर : येथे जन्मलेले आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचा २००० मध्ये शाहू स्मारक ट्रस्टच्या ...

कोल्हापूर : येथे जन्मलेले आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचा २००० मध्ये शाहू स्मारक ट्रस्टच्या राजर्षी शाहू पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. डॉ. नारळीकर यांच्या निधनानंतर शहरामध्ये त्यांच्या आठवणी जागविण्यात येत आहेत.

नारळीकरांचे मूळ घराणे भुदरगड तालुक्यातील पाटगावचे. परंतु पूर्वज आले आणि कोल्हापुरात महाद्वार रोडवर स्थायिक झाले. या ठिकाणचा नारळीकर वाडा पाडून काही वर्षांपूर्वी या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले. त्यालाही ‘नारळीकर भवन’ असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे आजोळही कोल्हापुरातीलच. शंकर आबाजी हुजूरबाजार हे त्यांचे आजोबा. नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी येथील दाभोळकर नर्सिंग होममध्ये झाला. परंतु त्यांचे सर्व शिक्षण बनारस विद्यापीठ आणि अन्य ठिकाणी झाले.

खगोलशास्त्रामध्ये भरीव कामगिरी करणारे डाॅ. नारळीकर यांच्या कामाची दखल घेऊन सन २००० सालचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला होता. यानंतर ११ नोव्हेंबर २००६ रोजी त्यांनी पाटगाव येथे पत्नी मंगला यांच्यासह भेट देऊन पूर्वजांविषयी माहिती घेतील होती.

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील मुलांशी केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांनी संवाद साधला होता. यावेळी अरुण नाईक आणि विनायक पाचलग यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठातही त्यांची व्याख्याने झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJayant Narlikarजयंत नारळीकर