शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वीजदरवाढ होणार कमी

By admin | Updated: January 15, 2015 00:35 IST

युनिटला रुपयाचा दिलासा : ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन; सुजित मिणचेकर यांची माहिती

शिरोली : राज्यातील औद्योगिक वीजदरवाढ १० ते १३ टक्के म्हणजेच प्रतियुनिट सुमारे एक रुपयाने कमी होण्याची शक्यता आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार सुजित मिणचेकर यांनी
आज, बुधवारी येथे पत्रकार बैठकीत दिली.राज्यातील उद्योगांना ४० टक्के वीजदरवाढीचा झटका महावितरणने दिला होता. राज्य शासनाने सबसिडी देणे बंद केल्याने ही दरवाढ करण्यात आली होती. या विरोधात राज्यभरातील उद्योजकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर ही सबसिडी आणखी दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती. तिची मुदत डिसेंबरमध्ये संपली. त्यामुळे उद्योगांना जानेवारीची वीज बिले ४० टक्के दरवाढीने येणार आहेत. ही दरवाढ असह्य असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील उद्योगांनी १२ जानेवारीपासून तीन दिवसांच्या बंदचे हत्यार उपसले होते. मात्र, आमदार मिणचेकर यांनी वीजदरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला होता.आमदार मिणचेकर यांनी नागपूर येथे ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन उद्योजकांची भूमिका व उद्योगांसमोरील अडचणी सांगितल्या व दरवाढ कमी करण्याची विनंती केली. वीजदरवाढीमुळे उद्योग परराज्यांत जाऊ नयेत यासाठी तातडीने वीज दरवाढीबाबत ऊर्जामंत्री व उद्योगमंत्री यांच्याबरोबर चर्चा केली. उद्योजकांना दिलासादायक वीजदर मिळेल, असे आमदार मिणचेकर म्हणाले. यावेळी उद्योजक राजू पाटील, दीपक पाटील, गणेश भांभे, सुरेंद्र जैन उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वीज धोरण या महिन्यात होणार जाहीर
वीज धोरण या महिन्यात जाहीर होणार आहे, त्यामुळे ही वीजदरवाढ प्रति युनिट एक रुपयाने म्हणजेच १० ते १२ टक्क्याने कमी करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्योजकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील बिलांमधील सवलत मिळालेली नाही याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्री, वित्तमंत्री, ऊर्जामंत्री, उद्योगमंत्री आणि उद्योजक यांची मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले असल्याची माहिती मिणचेकर यांनी दिली.