शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 14:23 IST

Crime News Kolhapur- जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी , कुरुंदवाड या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या चार घटना घडल्या. या चोरींची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यात चार ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटनाचोरींची नोंद चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये

कोल्हापूर : जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी , कुरुंदवाड या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या चार घटना घडल्या. या चोरींची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये झाली.जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोबाईल चोरीची फिर्याद आकाश रंगराव अस्ले (वय २३, मुळगाव म्हासुर्ली, राधानगरी, सध्या रा. महाकाली मंदीराजवळ,शिवाजी पेठ) यांनी दिली. त्यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून नेला.

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोबाईलची चोरीची फिर्याद ( स्नेहल संतोष लोहार (वय १९, रा. कुंभार गल्ली, चोकाक ) यांनी दिली आहे. त्या लक्ष्मीपुरी येथील बस थांब्यावरून रुकडी-माणगाव के.एम.टी.बसमध्ये चढत असताना पाठीवर अडकवलेल्या सॅकमधून त्यांचा मोबाईल अज्ञाताने लंपास केला.

तिसरी चोरीची घटना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. यामध्ये आरती सुधीर साखळकर (वय २७, रा. यादव कॉलनी, बँक ऑफ इंडियाजवळ, पेठवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दाभोळकर कॉर्नर सिंग्नल परिसरातील के.एम.टी.बस थांब्याजवळ त्या के.एम.टी.बसमध्ये चढत असताना त्यांच्या ड्रेसवरील ॲप्रनमध्ये ठेवलेला मोबाईल अज्ञाताने लंपास केला.

चौथी घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. यात प्रविण प्रकाश ऐनापुरे (वय ३९, रा. औरवाड, ता. शिरोळ) यांनी दिली. ते कुरुंदवाड आठवडा बाजारामध्ये दौलतशहा दर्ग्यासमोर भाजीपाला खरेदी करीत होते. अज्ञाताने त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMobileमोबाइलkolhapurकोल्हापूर