शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: लॅबचालकास रुग्णांचे पैसे परत करण्याचे आदेश देऊ, अधिष्ठातांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 11:47 IST

सीपीआरमधील लॅब सुरू असल्याचा दिखावा...

कोल्हापूर : येथील सीपीआरमध्ये काही डॉक्टर खासगी रक्ततपासणी लॅबशी संगनमत करून आर्थिक लुबाडणूक केल्या प्रकरणाची स्वतंत्र समिती करून चौकशी केली जाईल, संबंधित लॅबचालकाचा शोध घेऊन घेतलेले पैसे रुग्णांना परत देण्यास भाग पाडू, असे आश्वासन सीपीआरचे अधिष्ठाता सदानंद भिसे यांनी शुक्रवारी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी शिष्टमंडळातर्फे भिसे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, सीपीआरमध्ये गरीब रूग्ण उपचार मोफत मिळतात म्हणून येतात. पण येथील काही डॉक्टर त्यांना लुटत आहेत. खासगी लॅबचालकाकडे पाठवून पन्नास टक्के कमिशनचा धंदा मांडल्याचे आम्ही उघड केले. त्याची सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी करावी. प्रसूती विभागात दैनंदिन खासगी लॅबचे एजंट वावरतात. नातेवाईकांकडे चौकशी केलेली रक्कम एका दिवसाची दीड ते दोन लाख रुपयांची आहे.

वाचा : तुमच्या कार्यपद्धतीमुळे माणसे रस्त्यावर मरतील, सीपीआरच्या कारभारावर मंत्री आबिटकर संतापले याप्रकरणी दोषी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. सीपीआरमध्ये नोकरी करणाऱ्या डॉक्टरांना नियमाप्रमाणे पूर्ण दिवस सेवा देण्यास भाग पाडावे. हालचाल वहीत नोंदी कराव्यात. बायोमेट्रिक, फेस रीडिंग बंधनकारक करावे. यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, राहुल पाटील, अभिजित कांजर, सरदार पाटील, हरीश पाटील, प्रशांत निगडे, सतीश पाटील, राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

सीपीआरमधील लॅब सुरू असल्याचा दिखावा...खासगी लॅबचालकांशी संगनमत असल्याने सीपीआरमधील लॅब दिखाव्यासाठी सुरू ठेवले जाते. रात्रपाळीत येथे रक्ततपासणी केली जात नाही, अशी तक्रार रूपेश पाटील यांनी केली. सीपीआरमधील रक्तचाचणी लॅब २४ तास सुरू ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur CPR: Dean assures refund of patient's money from lab.

Web Summary : CPR Dean promises inquiry into doctor-lab collusion, refunding exploited patients. Swabhimani Sambhaji Brigade submitted a memorandum alleging exploitation and demanding action against involved doctors and 24/7 lab services.