शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शुभेच्छा फलकावरून इचलकरंजीत तणाव

By admin | Updated: June 23, 2015 00:58 IST

दोन्ही गटांकडून घोषणाबाजी : जवाहरनगर परिसरात काही काळ जमावबंदी

इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरातील मराठा चौकात लावलेल्या शुभेच्छा फलकावरून सोमवारी सायंकाळी दोन गटांत पुन्हा वाद उफाळून आला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी जवाहरनगर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला. रात्री ती शिथिल करण्यात आली. याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्रभर शहरात पोलीस गाड्या गस्त घालत होत्या.जवाहरनगर परिसरातील मराठा चौकालगत प्रार्थनास्थळ आहे. एका समाजाचा पवित्र महिना सुरू झाल्याने काही नागरिकांनी या महिन्याच्या शुभेच्छांचा फलक या चौकात उभारला. गुरुवारी रात्री तो अज्ञातांनी फाडला. यामुळे शुक्रवारी सकाळी एका समाजाच्या नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार बंदोबस्त नेमला होता. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाऱ्यामुळे हा फलक थोडा वाकल्याने पुन्हा गैरसमज निर्माण झाला. त्यातच विनापरवाना हा फलक लावल्याने तो काढून घ्यावा, अशी तक्रार नगरपालिकेकडे आली. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी हा फलक काढण्यासाठी आले. तेथे नागरिक व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्यात परवाना घेऊन फलक लावण्याबाबत चर्चा सुरू झाली. यावेळी परिसरातील दोन्ही समाजाचे तरुण जमले. त्यांनी परस्परविरोधी घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव वाढला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंनी चर्चा व वादविवाद होऊन वाद निवळला. शिवसेनेचे मलकारी लवटे यांनी पोलिसांशी बोलणी झाली असून, विनापरवाना फलक लावला जाणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळात नव्याने शुभेच्छा फलक तयार करून पोलीस बंदोबस्तात उभारण्यात आला. त्यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली.फलक उभारण्याचे काम पुन्हा सुरू झाल्याचे समजताच गेलेले कार्यकर्ते पुन्हा एकत्र जमू लागले. त्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ज्यादा कुमक मागवून जमावाला पांगविले. यावेळी १४४ कलम जारी करून जमावबंदी लागू केली. पोलिसांनी स्ट्रायकिंग फोर्ससह मोठा पोलीस बंदोबस्त ठावला आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक महंमद मकानदार, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, शिवाजी कणसे, सतीश पवार, डी. एल. सुरवसे यांच्यासह अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. (वार्ताहर)...तर वाद वाढला नसता !पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही बाजूच्या नागरिकांना समजावून सलोख्याने तोडगा काढला असता, तर वाद एवढा विकोपाला गेला नसता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.एक तासासाठी जमावबंदीदरम्यान, इचलकरंजीत केवळ एक तासासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आता तेथील परिस्थिती शांत आहे, असे रात्री उशिरा जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापुरात पत्रकारांना सांगितले.