शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घोडावत ग्रुपचे दुष्काळग्रस्तांसाठी सव्वा कोटी

By admin | Updated: August 27, 2015 00:36 IST

संजय घोडावत यांचा पुढाकार : अडीच हजार शेतकऱ्यांना लाखमोलाची मदत

कोल्हापूर : वडील दानचंदजी घोडावत यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून व आई सुशिला घोडावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योगपती संजय घोडावत यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील अल्पभूधारक अडीच हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत घोडावत समूह करणार आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम कमी असली तरी ती आजच्या अडचणीच्या काळात लाखमोलाची आहे.गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा पाऊस अत्यंत कमी झाला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जाताना शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम घोडावत यांनी हाती घेतले आहे. संजय घोडावत ग्रुप व संजय घोडावत इन्स्टिट्युशन्स अतिग्रे यांच्यातर्फे हा माणुसकी जपणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिरोळ व हातकणंगले तालक्यांतील बहुसंख्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. एक एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेले कोरडवाहू शेतकरी व ज्यांचे ऊस लागवड व्यतिरिक्त इतर कोणत्याही दुष्काळ नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य मार्गाने पिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची मदत देण्यात येईल. छाननी समितीने ग्राह्ण धरलेल्या अर्जांचाच फक्त विचार करण्यात येईल. निवड समितीद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना पोस्टाद्वारे कळविण्यात येईल. त्यानंतर क्रमाक्रमाने आर्थिक मदत दिली जाईल. संजय घोडावत ग्रुप व संजय घोडावत इन्स्टिटयुशन्स सामाजिक भान बाळगून नैसर्गिक आपत्तीच्यावेळी आपत्तीग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. ग्रुपने पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त यांना कायमच मदतीचा हात दिला आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील गरजूंनाही नेहमीच मदत केली आहे. (प्रतिनिधी)कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहनसात-बाराचा उतारा व शेतकरी पुरावा, शेतसारा पावती, आधारकार्ड, नुकसान झाल्याचा पंचनामा आदी कागदपत्रांसह नुकसानभरपाई मिळण्याच्या विनंती अर्जासह आठ दिवसांच्या आत संजय घोडावत इन्स्टिट्यूशन्स, अतिग्रे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन घोडावत यांनी केले आहे.