शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, अर्ध्या तासातच रस्त्यावर झाल्या नद्या; ओढ्यात शाळकरी मुलगा वाहून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:22 IST

कोल्हापूर : शहरात सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडासह पावसाने जोरदार हजेरी लावली. नाले, गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी ...

कोल्हापूर : शहरात सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडासह पावसाने जोरदार हजेरी लावली. नाले, गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यातूनच काही वाहनधारक वाहतूक करत होते. 

ढग दाटून आल्याने सायंकाळी ४ नंतर अचानक काळोख पसरला. ढगांच्या गडगडासह विजा चमकू लागल्या अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानकच ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने विक्रेत्यासह, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अवघ्या अर्ध्या तासात शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. पावसाचा जोर असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. 

दरम्यानच, सरनोबतवाडी ते मणेरमाळ दरम्यान असलेल्या ओढ्यात शाळकरी मुलगा वाहून गेला. पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शोध मोहिम सुरु आहे. यावेळी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

हवामान खात्याने राज्यात आज, गुरुवार पासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली होती. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात ‘ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषत: शनिवार दि. १४ ते सोमवार दि. १६ जून ह्या तीन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.