शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता जिजाऊंना अभिवादन

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

शहरात प्रतिमापूजन : विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : राजमाता जिजाऊ यांच्या ४१७ व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संघटना, संस्थांच्यावतीने जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनपाच्यावतीने के.एम.सी. कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर मोहन गोंजारे, नगरसेवक रविकिरण इंगवले, इंद्रजित बोंद्रे, नगरसेविका प्रभाताई टिपुगडे, मीना सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.
गुरुवार पेठ येथील राजमाता तरुण मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष संदीप कसबेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, बजरंग दलाचे संभाजी साळोखे, ऋतुराज क्षीरसागर, किरण शिराळे, वीरेंद्र मंडलिक, हर्षल सुर्वे, हेमंत कांदेकर, दीपक काटकर, संदीप देसाई, आदी उपस्थित होते.
शुक्रवार पेठ येथील शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे के.एम.सी. कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता करून रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानचे सदस्य कुणाल बोडके व संभाजी पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष स्वप्निल पाटील, सचिव विकास भोसले, प्रशांत जाधव, प्रवीण कांबळे, संकेत भोसले, अबिद गडकरी, प्रफुल्ल भालेकर, अमोल पोवार, राहुल सूर्यवंशी, बंडू माळी, सागर सावंत, शेखर महाडिक, राकेश माताडे, आदी उपस्थित होते.


सीपीआरमध्ये बालसंगोपन साहित्य वाटप
राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आज, सोमवारी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) प्रसूती विभागात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी नवजात बालकांना बालसंगोपनविषयक साहित्याचे वाटप केले. रविवारी (दि. १२) मध्यरात्रीपासून जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींना साबण, तेल, पावडर असे सुमारे ५० जणांना बालसंगोपनविषयक साहित्य देण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात, विभागप्रमुख डॉ. शिरीष शानभाग व परिचारिका यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी चंद्रकांत पाटील, चारुशीला पाटील, बाळासाो पाटील, फिरोजखान उस्ताद, विकास जाधव, आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयातील बाळंतीण महिलांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने बालसंगोपनविषयक साहित्याचे वाटप केले.

विद्यापीठात अभिवादन
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज, सोमवारी शिवाजी विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातील पोर्चमध्ये प्रतिमा पूजन झाले. प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्यासह विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. मेधा नानिवडेकर, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. व्ही. एन. शिंदे, बाळासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.