शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता द्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो :ठाकरे

By admin | Updated: August 22, 2014 00:52 IST

शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन : संजय घाटगेंना कागलमधून उमेदवारीे

कोल्हापूर : दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला, आता बारी महाराष्ट्राची. महाराष्ट्राची सत्ता द्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, गुरुवारी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते व माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हमीदवाडा (ता. कागल) येथील साखर कारखान्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ््याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश आबीटकर व मंडलिक यांचा नातू वीरेंद्र मंडलिक यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याच कार्यक्रमात मंडलिक यांनी संजय घाटगे यांची कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी मंडलिक व घाटगे यांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला. खासदार मंडलिक म्हणाले, लोकसभेचीच पुनरावृत्ती विधानसभेला होणार आहे. तुम्ही मला जसे आजपर्यंत पाठबळ दिले तसेच पाठबळ या पुढील वाटचालीत प्रा. संजय मंडलिक यांना द्या. जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करूया. संजय मंडलिक म्हणाले, मुश्रीफ यांनी दोनवेळा कारखान्याची निवडणूक लढविली; परंतु स्वाभिमानी जनतेने त्यांचा पराभव केला. आता शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून त्यांना कारखान्यांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही.’ संजय घाटगे म्हणाले, ‘कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नायनाट केल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. यावेळी आमदार सर्वश्री दिवाकर रावते, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे उपस्थित होते.