शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

बचतीसाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By admin | Updated: July 3, 2015 00:49 IST

‘एसटीपी’ प्लँट : जून ते आॅक्टोबरपर्यंत सांडपाणी थेट पंचगंगेत; मनपाचे आंधळेपणाचे धोरण

संतोष पाटील-कोल्हापूर -कसबा बावड्यातील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कुचकामी ठरल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यावर्षी उन्हाळ्यात किमान तीसहून अधिक दिवस दररोज मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळले. यंदाच्या पावसाळ्याची चाहूल लागताच बंधाऱ्याला धोका नको, या कारणास्तव बरगे काढून काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी नदीत सोडले. महापालिकेचे धोरण, आंधळेपणामुळे उघडिपीनंतरही मैलामिश्रित पाणी नदीत जातच आहे. दरम्यान, एसटीपी प्रकल्प बंद असल्यामुळे प्रतिदिन १,०७,२३६ रुपये प्रक्रिया खर्चाचे पैसे वाचत असल्याने नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले, तरी मनपाच्या तिजोरीत मात्र लाख रुपयांचा पाऊस पडतो.महापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी तयार होते. एक एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४११ रुपये खर्च येतो. प्रक्रिया केंद्राची सध्याची क्षमता ७६ एमएलडी आहे. त्यानुसार प्रतिदिन १,०७,२३६ रुपये प्रक्रिया खर्च अपेक्षित आहे. पावसात नदीत जाणाऱ्या सांडपाण्याची तीव्रता कमी असते तसेच पावसाळ्यातही जयंती नाल्यातील पाणी उपसा करून प्रक्रिया केली जाते, असा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. परिणामी पावसाळ्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यास इतर दिवसांतील पाण्यापेक्षा आपोआपच कमी खर्च येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या हे वाचणारे पैसे मनपाला मिळत असले तरी एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ठेकेदार मालामाल होणार आहे. ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची ३० टक्के रक्कम ठेकेदाराने घातली आहे. ते पैसे भागविण्यासाठी नागरिकांवर गेली दीड वर्षे एसटीपी बंद काळातही सांडपाणी अधिभारातून पैसे उकळले जात आहेत. पुढील १३ वर्षांसाठी नागरिकांच्या खिशाला ही चाट बसणार आहे.इच्छाशक्तीचा अभावबंधाऱ्याला बरगे घालण्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर तत्काळ बरगे घालणे किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर लगेच बसविणे शक्य नसल्याचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. मात्र, एक-दोन कर्मचाऱ्यांकडून बरगे घालणे व काढण्यापेक्षा ५० पेक्षा अधिक कर्मचारी लावून एका दिवसात पाणी अडविणे शक्य आहे किंवा बंधाऱ्याची उंची वाढवून त्याची क्षमता वाढविण्याची प्रयत्न होताना दिसत नाहीत. याकामी आंधळे धोरण आडवे येत असल्याचे चित्र आहे.प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बी.ओ.डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक १० एम.जी. प्रती लिटरपेक्षा कमी असतात, तर सध्या नदीत मिसळणाऱ्या काळ्या सांडपाण्याचा बीओडी २०० एम.जी. प्रती लिटरपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यावरून सांडपाणी शुद्धिकरणाचे महत्त्व लक्षात येते. पावसाळ्यात नदी प्रवाहित असते. दृश्य स्वरूपात प्रदूषणाची तीव्रता जाणवत नसल्याने तक्रारींचे प्रमाण कमी असते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत सुस्त व निवांतच असल्याचे चित्र आहे.