शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज पालिकेतील राजकीय समीकरण बदलणार..! : भाजपविरोधात जनता दल, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 23:24 IST

गडहिंग्लज कारखान्याप्रमाणेच पालिकेच्या राजकारणात आमदार मुश्रीफ हे शिंदेंसोबतच राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात पालिकेतही नवे समीकरण पाहायला मिळेल.

ठळक मुद्दे वाढीव हद्दीतील निवडणूक

राम मगदूम।गडहिंग्लज : राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज नगरपालिकेतील राजकीय समीकरणदेखील बदलण्याची शक्यता आहे. वाढीव हद्दीतील निवडणुकीत भाजपविरोधात सत्ताधारी जनता दल आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला पालिकेच्या सत्तेपासून दूर व्हावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नोव्हेंबर २०१६ मध्ये पालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दलाच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना युती असा तिरंगी सामना झाला. त्यावेळी जनता दलाला नगराध्यक्षपदासह ११, राष्ट्रवादीला ४, भाजपला २ व सेनेला १ जागा मिळाली होती; परंतु निवडणुकीनंतर भाजप-सेनेने जनता दलाबरोबर युती केली.

केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून जनता दलाने भाजप-सेनेला पालिकेत सोबत घेतले. महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद देऊन त्यांना सत्तेत सामावून घेतले; परंतु तीन वर्षांत नियमित निधी वगळता शासनाकडून शहरातील विकासकामांसाठी रुपयाचादेखील निधी मिळाला नाही. म्हणूनच, आता राष्ट्रवादीला सोबत घेतले जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देऊन ‘गडहिंग्लज’मधून मताधिक्य दिले. त्यामुळे गडहिंग्लज कारखान्याप्रमाणेच पालिकेच्या राजकारणात आमदार मुश्रीफ हे शिंदेंसोबतच राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात पालिकेतही नवे समीकरण पाहायला मिळेल.

‘जद’ला काय फायदा ?आमदार मुश्रीफ हे राज्यातील वजनदार नेते असल्याने नजीकच्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या सहकार्याने शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून भरीव निधी मिळविण्यासाठी जनता दलाला आता राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागणार आहे.

‘शिंदें’चे विधान सूचकगडहिंग्लजच्या हद्दवाढीला आपल्यामुळेच मंजुरी मिळाल्याने वाढीव दोन्ही जागांवर आपलाच अधिकार असल्याचा दावा भाजपने केल्यामुळेच भाजप नगरसेवकांनी आघाडीसोबत राहावे, अन्यथा खुशाल बाहेर पडावे, असे सूचक विधान शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आहे. यातूनच पालिकेतील समीकरण बदलण्याचे संकेत मिळाले.

राष्ट्रवादीला काय फायदा?सत्ताधारी जनता दलासोबत जाऊन एखाद्या समितीचे सभापतिपद मिळवून पालिकेच्या सत्तेत जाण्याची संधी राष्ट्रवादीला आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपाShiv Senaशिवसेना