शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतून संकलित होणारा 'ई कचरा'

By admin | Updated: December 17, 2014 23:58 IST

‘रोटरी क्लब आॅफ करवीर’चा उपक्रम

कोल्हापूर : जागतिक पातळीवर ई कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्याबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या हेतूने येथील रोटरी क्लब आॅफ करवीरच्यावतीने २० डिसेंबर व २३ जुलै अशा दोन दिवशी ‘ई कचरा संकलन’ उपक्रम आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमात शहरातील २३३ शाळांतील हजारो विद्यार्थी सहभागी होत असल्याची माहिती रोटरी करवीरचे अध्यक्ष हरेश पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली. ई कचरा ठेवायला जागा मिळत नाही, या वस्तू दररोजच्या कचऱ्यात सापडतात. ओल्या कचऱ्यात अशा वस्तू मिसळल्यामुळे त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. ई कचरा जळून किंवा जमिनीत पुरूनही नष्ट होत नाहीत. त्या उघड्यावरही टाकून चालत नाही. ई कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यासाठी समाजात जागृती करण्याच्या हेतूने २० डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथीदिनी तर २३ जुलै ‘वनसंवर्धन दिन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील महानगरपालिका, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घर, परिसरातील ई कचरा आणून तो शाळेत जमा करायचा आहे. शाळांमध्ये ‘रोटरी’तर्फे मोठ्या आकाराची पितळी पिशव्या देण्यात येणार असून, त्या पिशवीत ई-कचरा टाकायचा आहे. हा कचरा त्याच दिवशी सायंकाळपर्यंत एका ठिकाणी संकलित करून ठेवला जाईल नंतर तो टेंडर काढून विकण्यात येणार असल्याचे एस. एन. पाटील यांनी सांगितले. पर्यावरणसंबंधित या उपक्रमात भाग घेऊन जास्तीत जास्त ई कचरा संकलित करणाऱ्या शाळेस रोटरी ‘आंतरराष्ट्रीय कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमास महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ , जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग यांचे सहकार्य मिळाले असून ‘रोटरी’चे १२० स्वयंसेवक त्यात भाग घेणार आहेत. यावेळी प्रमोद चौगले यांनी उपक्रमाबाबत प्रेझेंटेशन दिले. (प्रतिनिधी)