शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

बस्तवाडमधील पिण्याचे पाणी दूषितच

By admin | Updated: November 7, 2014 23:51 IST

प्रयोगशाळेने दिला अहवाल : स्वच्छ पाणी पुरविणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी : अधिकाऱ्यांची उत्तरे

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील बस्तवाड येथे कृष्णा नदीतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल अणुुजैविक तज्ज्ञ उपविभागीय प्रयोगशाळेने दिला आहे. मात्र, गावासाठी पुरविण्यात येणारा स्वच्छ पाण्याचा पुरवठा हा ग्रामपंचायतीनेच करायचा आहे, अशी बेजबाबदार उत्तरे विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून येथील ग्रामस्थांना दिली जात आहेत. एकूणच शासनाच्या प्रतिनिधींकडून दूषित पाणीप्रश्नी हात झटकले जात असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.बस्तवाड (ता. शिरोळ) गावाला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा होत आहे. गेले चार दिवस गावाला मळी मिश्रित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अजूनही कुरुंदवाड नगरपरिषद, श्री गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी, श्री दत्त कारखाना शिरोळ यांच्यावतीने टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य सामाजिक आरोग्य सेवेच्या अणुुजैविक तज्ज्ञ उपविभागीय प्रयोगशाळेत कृष्णा नदीतील बस्तवाड पाणवठ्याजवळील पाण्याची तपासणी केली असता, पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल ग्रामपंचायतीला मिळाला असल्याची माहिती ग्रामसेवक आर. आय. कोळी यांनी सांगितली.गावात साथीचा एकही रुग्ण आढळला नसून, टाकळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी एम. ए. ऐनापुरे, आरोग्य सहायक अमोल कोळी, प्रकाश बुरुटे, धनंजय मस्के, एस. बी. सिद्ध, विमल जंगम यांचे पथक गावात तळ ठोकून आहे. आज, शुक्रवारी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, इकबाल बैरागदार, पंचायत समिती सभापती शीला पाटील यांनी भेट दिली. (वार्ताहर)दोघा अभियंत्यांची सामाजिक बांधीलकीबस्तवाड गावाला थेट नदीतून पाणीपुरवठा होत असल्याने गावाला वारंवार अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने, येथील पुणे येथे अभियंता असलेले सुनील बाळासो कोळी व संदीप आण्णासो जंगम या दोन युवकांनी गावासाठी आठ लाखांची फिल्टर पाणीपुरवठा योजना स्वखर्चाने बांधून देणार असल्याचे सांगितले आहे.