शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मीळ लघुपट चित्रपट संग्रहालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 13:14 IST

Cinema Kolhapur : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जुलै १९६८ मध्ये तयार झालेल्या ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा दुर्मीळ लघुपट पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखल झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मीळ लघुपट चित्रपट संग्रहालयातलघुपटाचे लवकरच डिजिटायझेशन

संदीप आडनाईक

कोल्हापूर : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जुलै १९६८ मध्ये तयार झालेल्या ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा दुर्मीळ लघुपट पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखल झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली.

‘व्हटकर प्रॉडक्शन्स’ बॅनरची निर्मिती असलेल्या १८ मिनिटांच्या या लघुपटाचे दिग्दर्शन कोल्हापूरचे दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी केले होते. लघुपटाला सुप्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर यांचे संगीत होते, तर सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी या लघुपटाचे निवेदन केले होते. या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे केली होती. हा लघुपट मुळात ३५ एमएमच्या स्वरूपात असून, त्याची १६ एमएम स्वरूपातील प्रिंट संग्रहालयाला मिळाली आहे.

या दुर्मीळ लघुपटात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यांच्या अखेरच्या काळातील काही घटनांचे ‘फुटेज’ यामध्ये पाहायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे स्वीकारललेला बुद्ध धर्म, तसेच त्यांनी केलेला नेपाळ दौरा, याशिवाय मुंबई येथील दादर चौपाटी येथे आंबडेकर यांच्या निघालेल्या अंत्ययात्रेचे ठळक चित्रीकरण या लघुपटात पाहायला मिळते. या लघुपटाचे छायाचित्रण मधुकर खामकर यांनी केले असून, जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे.

लघुपटाचे लवकरच डिजिटायझेशन

ग्रामीण भागात वितरण करण्याच्या हेतूने या लघुपटाच्या १६ एमएमच्या प्रिंटस्‌ काढल्या असाव्यात. या प्रिंटची सध्याची अवस्था ही मध्यम स्वरूपातील असून, त्याचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येईल जेणेकरून ती अधिकाधिक प्रेक्षकांना पाहता येऊ शकेल, अशी माहिती चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उद्या १४ एप्रिल रोजी देशात सर्वत्र उत्साहाने साजरी केली जात असतानाच डॉ. आंबेडकर यांच्यावरील हा दुर्मीळ लघुपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त होणे हा एक अपूर्व योगायोग आहे.-प्रकाश मगदूम,

संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे

 

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूरPuneपुणे