शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘सीपीआर’चे मंडळ स्थापनेलाच वादग्रस्त

By admin | Updated: August 29, 2015 00:05 IST

शासकीय नियुक्ती : ‘पत्रकार’ म्हणून कार्यकर्त्याची वर्णी

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावरील (अ‍ॅडव्हायजरी बोर्ड) सदस्यांच्या नियुक्त्या शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शुक्रवारी जाहीर केल्या. त्यामध्ये ‘राष्ट्रीय वृत्तपत्राचा स्थानिक प्रतिनिधी’ म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे स्थापनेलाच हे मंडळ वादग्रस्त बनले आहे. पत्रकारांनी त्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाच धारेवर धरले. तुमचाही कारभार काँग्रेसवाल्यांसारखाच असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री पाटील या मंडळाचे अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक यांच्यासह महेश जाधव, सुनील लक्ष्मण करंबे, शीतल सुभाष रामुगडे यांचा समावेश आहे. प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या म्हणून डॉ. सुरेखा नरेंद्र बसरगे, प्रतिष्ठित तज्ज्ञ म्हणून डॉ. इंद्रजित बळिराम काटकर, तज्ज्ञ म्हणून डॉ. अजित भैरवनाथ लिके यांची वर्णी लावली आहे. ‘राष्ट्रीय वर्तमानपत्राचा स्थानिक प्रतिनिधी’ म्हणून अजित दत्ताजी गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे; परंतु ते स्वत: कोणत्याच वृत्तपत्राचे काम करीत नाहीत. या निवडी जाहीर झाल्यावर त्यांना विचारणा केल्यावर ते स्वत:ही ‘पत्रकार’ म्हटल्यावर आश्चर्यचकित झाले. गायकवाड हे शिवसेनेचे कार्यकर्ते असून, पंचगंगा तालीम परिसरातून त्यांच्या पत्नीने यापूर्वी निवडणूक लढविली आहे.पंधरा जणांच्या मंडळावर पाच शासकीय सदस्य आहेत. त्यामध्ये या महाविद्यालयाचे अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक, महापालिका आरोग्य समितीचे प्रमुख, वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी व विभाग प्रमुखांचा समावेश आहे. सीपीआर बचाव समितीतील कुणाची तरी या मंडळावर निवड लागेल, अशीही लोकांना अपेक्षा होती; परंतु त्यांनी फक्त आंदोलनच करावे, असा विचार सरकारने केल्याचे दिसते आहे.देशी दारूची दुकानेया मंडळावर नियुक्ती झालेल्या एका सदस्याची संभाजीनगरला व परिते (ता. करवीर) येथे देशी दारूची दुकाने आहेत. अशा व्यक्तीची मंडळावर नियुक्ती करून त्यांनी शाहू महाराजांच्या नावाने असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयास नेमका कोणता सल्ला द्यावा, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.