शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

सेवा हमी कायद्याबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: July 2, 2015 01:03 IST

लेखी स्पष्टीकरणाची प्रतीक्षा : जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर : सेवा हमी कायद्याबाबत अध्यादेश प्राप्त झाला असला तरी या नवीन कायद्यानुसार कशा पद्धतीने कामकाज लागू करावे याबाबत महसूल विभागाकडून कोणतेही लिखित स्पष्टीकरण आले नसल्यामुळे जिल्हा प्रशासन संभ्रमात पडले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून लेखी स्पष्टीकरण येताक्षणीच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी सांगितले. राज्यात १ जुलैपासून सेवा हमी कायदा लागू करण्याचा निर्णय भाजप-शिवसेना सरकारने घेतला असून, तसा अध्यादेश सरकारने राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता, परंतु कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याच्या दिवसापर्यंत हा कायदा कशाप्रकारे राबवावा, कामकाज कसे लागू करावे, पहिले व दुसरे अपिल कोणाकडे करावे याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण सरकारकडून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनात दिवसभर संभ्रम तयार झाला होता. बुधवारी जिल्ह्णातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांची बैठक झाली. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. या सर्वांना सूचना देण्यात आल्या. मात्र, कायद्याचे स्वरुप लेखी स्वरुपात जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्यांच्या अंमलबजावणीत अडचणी येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारपासूनच या कायद्याची अंमलबजावणीची पूर्वतयारी केली होती.सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी महसूल खात्यातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यात यावीत, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनांनी सरकारकडे केली आहे. रिक्त पदांमुळे कायद्याची अंमलबजावणी करण्यात अडचणी येणार आहेत तसेच एखाद्या व्यक्तीने काही दाखले मागणी केली असतील आणि त्यामध्ये काही कागदपत्रे अपूर्ण असतील तर निर्धारित मुदतीत दाखला देता येणार नाही. त्यामुळे नेमके कोणत्या तारखेपासून निर्धारित दिवस धरायचे याबाबतही अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. नवीन कायदे होतात, नवीन नियम होतात. कामकाजाच्या पद्धतीत बदल होतात. त्याची अंमलबजावणी अधिकारी स्तरावर करावी लागते परंतु अशा बदलेल्या कायद्यानुसार कामकाज करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा अधिकारीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषद लांबचसेवा हमी कायद्यात जिल्हा परिषदेच्या कोणत्या सेवा घेतल्या आहेत हे ग्रामविकास विभागाकडून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सेवा हमी कायद्यापासून लांब आहे. राज्यात १ जुलैपासून सेवा हमी कायदा लागू करण्याचा निर्णय भाजप-शिवसेना सरकारने घेतला आहे तसा अध्यादेश सरकारने राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता, परंतु कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यासंबंधीचे पत्र जिल्हा परिषदेला आलेले नाही. त्यामुळे सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) चंद्रकांत वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा देण्यास प्रशासनास बंधनकारक ठरणारा हा सेवा हमी कायदा महापालिकेत अंतिम मुदतीपूर्वी लागू केला जाईल. कायद्याबाबत सर्व खातेप्रमुखांना माहिती देऊन त्याचे गांभीर्य सांगण्यात आले आहे. अधिकारी वर्ग कमी असला तरी याचे कारण न सांगता विहित वेळेत नागरिकांना सेवा द्यावीच लागेल. - विजय खोराटे, उपायुक्त प्रभारीच ‘लई भारी’परिवहन व्यवस्थापक, नगरसचिव, तीन उपशहर अभियंता, एलबीटी मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, आदी सर्वच महत्त्वाच्या पदांवर पूर्ण वेळ अधिकारी नाही. गेली कित्येक वर्षे ही पदे प्रभारींकडे आहेत. प्रभारीच ‘लई भारी’ ठरत असून, त्यांचीच मनमानी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कायद्यानंतरही सेवेची हमी मिळण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.