शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये बोगस पोस्टल मतदान

By admin | Updated: October 17, 2014 22:53 IST

संजय घाटगे, मंडलिक यांचा आरोप : चौकशी करण्याची मागणी

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी निवडणूक यंत्रणेतील कच्चे दुवे हाताशी धरून लष्करातील सुमारे ७०० जवानांचे बोगस पोस्टल मतदान केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार संजयबाबा घाटगे व शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी आज, शुक्रवारी येथे केला. लष्करातील जवानांच्या नावे बोगस मतदान करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. कागल पोस्ट आॅफिससमोरील पोस्टाच्या पेटीत एकाच वेळी ६०० ते ७०० पोस्टल मतपत्रिका आढळून आल्यानंतर घाटगे व मंडलिक यांना संशय आला. लष्करातील जवानांना पाठविलेल्या पिवळ्या रंगाच्या मतपत्रिका एकाच वेळी कशा येऊ शकतील, अशी शंका बळावल्यानंतर आज दिवसभर या प्रकरणाचा पाठपुरावा केला; तसेच अधिक माहिती घेतली. त्यावरून या पोस्टल मतपत्रिका बोगस असल्याचे त्यांचे ठाम मत झाले. यासंदर्भात जिल्हाधिकारी राजाराम माने, निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह, पोस्ट खात्याचे अधिकारी, राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविण्यात आली असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जवानांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. सायंकाळी घाटगे व मंडलिक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. घाटगे म्हणाले, ‘ कागल तालुक्यातील जवानांच्या मतपत्रिका हसन मुश्रीफ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘हायजॅक’ केल्या आहेत. मतपत्रिका असलेल्या लखोट्यावर लष्कराचे बोगस शिक्के व सह्या आहेत. कागलमध्ये लष्कराचे कसलेही केंद्र नसताना एवढ्या मोठ्या संख्येने मतपत्रिका कागलच्या पोस्टात पडल्यामुळे संशय वाढला आहे. शहानिशा केल्याशिवाय पोस्टल मतपत्रिका मोजणीसाठी घेऊ नयेत. जवानांचे मतदान पुन्हा घ्यावे. प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.