शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लसीवरून राजकारण करणारा भाजप महाराष्ट्रद्रोही, कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 18:48 IST

Shivasena andolan Bjp Kolhpaur- कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेने दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपचा ह्यमहाराष्ट्रद्रोहीह्ण असा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मुर्दाबाद, हाय हायच्या घोषणा दिल्या. लसीसाठी घाणेरडे, गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपला महाराष्ट्र कदापिही माफ करणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

ठळक मुद्दे लसीवरून राजकारण करणारा भाजप महाराष्ट्रद्रोही, कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने लसीकरणासाठी गलिच्छ राजकारण योग्य नव्हे

कोल्हापूर : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेने दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपचा ह्यमहाराष्ट्रद्रोहीह्ण असा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मुर्दाबाद, हाय हायच्या घोषणा दिल्या. लसीसाठी घाणेरडे, गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपला महाराष्ट्र कदापिही माफ करणार नाही, असा इशाराही देण्यात आला.जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोविड निर्बंधांचे पालन करीत मोजक्याच शिवसैनिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर अनोखे आंदोलन झाले. मोदी, फडणवीस, पाटील यांच्या प्रतिमांवर फुल्या मारलेला फलक हातात घेऊन भाजपच्या धिक्काराच्या जोरदार घोषणा दिल्या.यावेळी बोलताना संजय पवार यांनी सत्तेपासून लांब गेल्यानेच भाजपने टीका करण्याचा धंदा सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने जाणीवपूर्वक ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाच्या पातळीवर चांगले काम करीत असताना त्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याऐवजी भाजप यातही घाणेरडे राजकारण करीत आहे.

महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती कधीच नव्हती. संकटकाळात विरोधी पक्ष म्हणून फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी मदत करण्यासाठी राज्याची बदनामी चालवली आहे. राज्यात राहून राज्याचा अपमान हा छत्रपती शिवाजी महाराज, १०५ हुतात्म्यांचा अपमान आहे. भाजपच्या या गलिच्छ प्रवृत्तीला अखंड महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, अशीही टीका केली. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर