शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवाची सहावी माळ, अंबाबाईचे काशीविश्वेश्वराला दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 19:24 IST

Mahalaxmi Temple Kolhapur, navratri2020, kolhapurnews शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची काशीविश्वेश्वराला दर्शन देत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली.

ठळक मुद्दे नवरात्रौत्सवाची सहावी माळ, अंबाबाईचे काशीविश्वेश्वराला दर्शनतिरुपतीहून शालू अर्पण

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची काशीविश्वेश्वराला दर्शन देत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली.ही पूजा आहे भगवान शंकर काशी सोडून करवीरात निवासाला आले त्या प्रसंगाची. विश्वाच्या निर्मितीनंतर भगवान विष्णूंनी दोन क्षेत्रांची निर्मिती केली, एक उत्तरेला काशी, दुसरं दक्षिणेला करवीर. उत्तरेची काशी ही मुक्तिदायक ज्ञानपीठ, तिचं स्वामित्व भगवान विश्वेश्वराचं, तर दक्षिणेचं करवीर म्हणजे मुक्तीबरोबरच भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देणारं महामातृक म्हणजे शक्तीपीठ.

जेव्हा विष्णूंनी या दोन क्षेत्रांची तुलना केली, तेव्हा मुक्तीबरोबर भुक्ती देणारं हे क्षेत्र केवळ एका जवाच्या वजनानं श्रेष्ठ ठरलं म्हणून ही जवा आगळी काशी हा महिमा जाणून भगवान विश्वेश्वर आपल्या सर्व परिवारासह करवीरात आले. त्यांनी जगदंबेचं दर्शन घेतले आणि त्याप्रसंगी देवीने त्यांना सांगितले की, आपण माझ्या उजव्या बाजूला राहून सर्व भक्तांना तारक मंत्र द्या. त्याप्रमाणे आजही भगवान विश्वेश्वर माता अन्नपूर्णा धुंडीराज गणपती आणि काशी कुंडातील गंगेसह घाटी दरवाजाजवळ असलेल्या मंदिरात राहून भक्तांना मुक्ती देतात. ही या पूजेमागील आख्यायिका आहे. ही पूजा माधव मुनीश्वर आणि मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.तिरुपतीहून शालू अर्पणदरवर्षीप्रमाणे यंदाही तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने अंबाबाईला शालू अर्पण करण्यात आला. या शालूची किंमत एक लाख चार हजार इतकी आहे. देवस्थानचे ट्रस्टी भास्कर रेड्डी, लक्ष्मी रेड्डी, प्रशांती रेड्डी, स्वर्णलता रेड्डी, सुषमा जेट्टी, अपर्णा धर्मा रेड्डी, जया रमेश रेड्डी यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर