शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८५ रुग्णांना ‘स्वाइन फ्लू’

By admin | Updated: August 28, 2015 00:58 IST

आरोग्य यंत्रणा सतर्क : आठ महिन्यांत २३ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : वातावरणाच्या परिणामामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. जिल्ह्यात १९१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ८५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, २३ रुग्ण मृत झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांतील ही आकडेवारी आहे.त्यांमध्ये कोल्हापूर १५, सांगली ३, रत्नागिरी ३ अशी आकडेवारी आहे. या साथीला रोखण्यासाठी शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असून, ग्रामीण भागात ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १६ ग्रामीण रुग्णालये व ४ उपजिल्हा रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची तपासणी व उपचारांच्या सुविधा दिल्या जात आहेत, अशी माहिती ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. वातावरणातील बदलामुळे राज्यात तसेच तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि शेजारील राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राज्यात नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबादसह अन्य ठिकाणी स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते २६ आॅगस्ट २०१५ अखेर १९१ संशयित रुग्ण मिळून आले आहेत. त्यांपैकी ८५ रुग्णांना ‘फ्लू’ची लागण झाली आहे. या रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू असताना त्यामध्ये २१ रुग्ण मृत झाले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही भीती दूर करण्यासाठी तसेच स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी शासकीय पातळीवर घरोघरी जाऊन प्रबोधन करण्यात येत आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, शाळा-महाविद्यालये, वसतिगृहे, बाजार, सिनेमागृहे, आदी ठिकाणी ‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यासाठी १०८ फोन क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्णातील ५० ते १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांत उपचाराची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. ‘स्वाइन फ्लू’च्या औषधांचा तुटवडा येऊ नये यासाठी जिल्ह्यातील २२ खासगी औषध दुकानांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच सीपीआर येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे डॉ. साठे यांनी यावेळी सांगितले. बैठकीस जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र आडकेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. पी. देशमुख, कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे उपस्थित होते.या ठिकाणी चोवीस तास उपचारप्राथमिक आरोग्य केंद्र गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, आजरा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, कागल, शिरोळ, करवीर व गगनबावडा, इचलकरंजी येथील आय. जी. एम. रुग्णालय, महापालिका क्षेत्रात आयसोलेशन रुग्णालय, अ‍ॅपल सरस्वती, अ‍ॅस्टर आधार, सिद्धिविनायक, मोरया, स्वस्तिक व डी. वाय. पाटील, आदी रुग्णालयांत संशयित ‘स्वाइन फ्लू’ रुग्णांची तपासणी, नमुने घेणे, औषध उपचार करण्याची चोवीस तास सोय करण्यात आली आहे.