शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Raju Patil : राजू पाटील कोरोनाबाधित झाल्याचे कळताच, मनसे कार्यकर्त्याने गाठले पंढरपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 2:23 PM

MNS Raju Patil :राजू पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युवकांची संख्या मोठी आहे. कल्याण डोंबिवलीसह  संपूर्ण राज्यातील मनसेमधील युवावर्ग राजू पाटील यांचे चाहते आहेत.

कल्याण - कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे मनसेचे आमदार राजू पाटील (MNS Raju Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदारांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होऊन ते जनसेवेत पुन्हा रुजू व्हावेत या भावनेने डोंबिवलीचे मनसेचे शहर संघटक योगेश पाटील यांनी थेट पंढरपूर गाठत विठुरायाच्या चरणी अभिषेक करत दर्शन घेतले आहे. यावेळी पंढरपूर मधील मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. पाटील यांचे आपल्या  नेत्याप्रति असलेल्या निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

दरम्यान राजू पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युवकांची संख्या मोठी आहे. कल्याण डोंबिवलीसह  संपूर्ण राज्यातील मनसेमधील युवावर्ग राजू पाटील यांचे चाहते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही युवकांनी त्यांना भरघोस पाठींबा दिला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. तसंच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

"गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो. पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन," अशा आशयाचं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत.

 

टॅग्स :MNSमनसेcorona virusकोरोना वायरस बातम्याRaju Patilराजू पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूर