एक्सपायरी डेट बदलून व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २६ लाख ६३ हजारचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 19:04 IST2026-05-16T19:03:14+5:302026-05-16T19:04:09+5:30

एक्सपायरी डेट संपलेल्या व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थांवर बनावट लेबल लावून त्यांची पुन्हा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केला आहे.

Gang exposed for selling vitamin-rich foods by changing expiration dates | एक्सपायरी डेट बदलून व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २६ लाख ६३ हजारचा मुद्देमाल जप्त

एक्सपायरी डेट बदलून व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २६ लाख ६३ हजारचा मुद्देमाल जप्त

कल्याण : एक्सपायरी डेट संपलेल्या व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थांवर बनावट लेबल लावून त्यांची पुन्हा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण २६ लाख ६३ हजार ५०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोसेक वेलनेस प्रा. लि. कंपनीने तयार केलेल्या व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपल्यानंतरही काही जण त्या पॅकेट्स आणि डब्यांवर बनावट नवीन एक्सपायरी डेटचे लेबल लावून बाजारात विक्री करत आहेत. ही माहिती मिळताच १४ मे राेजी कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ परिसरातील मिनी बाजारातील शॉप क्रमांक ६८ जवेदा लॉज जुना मच्छीबाजार येथे छापा टाकण्यात आला.

आरोपी अब्दुलकरीम रईस खान (४०) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेट संपलेले व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली की, आरोपी हा माल भिवंडी येथील बिबल रामदुलार यादव (४३) याच्याकडून खरेदी करून आपल्या मिनी बाजार दुकानात विक्री करत होता. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी येथील गोदामावरही छापा टाकून एकूण २६ लाख ६३ हजार ५०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींना खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपल्याची पूर्ण जाणीव होती आणि हे पदार्थ लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, हे माहिती असूनही ते जुने लेबल काढून त्यावर नवीन तारखेचे बनावट लेबल लावून विक्री करत होते. जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये लिटर जॉयस मिलेट चोको क्रंच, ग्लूटेन फ्री पास्ता, पीनट बटर आणि चॉकलेट हेजलनट स्प्रेड यांसारख्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे.

Web Title : एक्सपायरी डेट बदलकर विटामिन खाद्य बेचने वाला गिरोह पकड़ा गया; ₹26 लाख का माल जब्त

Web Summary : कल्याण पुलिस ने एक्सपायरी डेट वाले विटामिन खाद्य पदार्थों को दोबारा लेबल लगाकर बेचने वाले गिरोह का भंडाफोड़ किया। कल्याण और भिवंडी में दुकानों और गोदामों से ₹26.63 लाख का माल जब्त किया गया। आरोपियों को पता था कि भोजन एक्सपायर हो गया है और खतरनाक है, फिर भी उन्होंने नकली लेबल लगाकर इसे बेच दिया।

Web Title : Gang Selling Expired Vitamin Food Busted; ₹26 Lakh Goods Seized

Web Summary : Kalyan police busted a gang relabeling expired vitamin foods for resale. They seized ₹26.63 lakh worth of goods from shops and godowns in Kalyan and Bhiwandi. The accused knew the food was expired and dangerous, yet sold it with fake labels.