कल्याण स्टेशन परिसरातील कारवाई प्रकरणी केडीएमसी आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना न्यायालयाची नोटिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:57 IST2026-05-06T20:56:49+5:302026-05-06T20:57:07+5:30
या प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.

कल्याण स्टेशन परिसरातील कारवाई प्रकरणी केडीएमसी आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना न्यायालयाची नोटिस
कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. याठिकाणी उड्डाणपूल उभारला जात आहे. स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलच्या इमारतीत भाडेकर असलेल्या अलंकार बेकरीवर कारवाईचा हातोडा चालविण्यात आला होता. या प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.
या प्रकरणी इसरार हुसेन सय्यद यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याचे वकिल उजैर नजे यांनी माहिती दिली की, अलंकार बेकरी कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयासह कल्याण न्यायालयात दावा दाखल आहे. कल्याण न्यायालयाचा या प्रकरणी स्थगिती आदेश आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी बेकरी दुकानावर कारवाई केली. या प्रकरणी कल्याण न्यायालयात दोन वेगवेगळ्या न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. याचिकाद्वारे मागणी करण्यात आली की, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, सहाय्यक संचालक नगररचना विभाग संतोष डोईफोडे, उपायुक्त प्रसाद बोरकर आणि सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना अटक वॉरंट बजविण्यात यावा.
या प्रकरणी तपास करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांची नियुक्ती करण्यात यावी. संबंधितान हाती बेड्या टाकून ताेंडावर बुरखा घालून हजर करण्यात याे. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी. त्यांच्या पगारी खात्यातून पैसे वळते करण्यात यावेत. ताेडण्यात आलेला बेकरीचा गाळा पून्हा ताच बनवून द्यावा. या मागणीची दखल घेत जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. अष्टूरकर यांनी आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना तुमच्या विरोधात याचिकाकर्त्याने केलेल्या मागणीनुसार का कारवाई करण्यात येऊ नये अशी नोटिस बजावली आहे. या प्रकरणी १५ जून रोजी सुनावणी होणार आहे.