डोक्याला जखम झाल्यावर डॉक्टर रूग्णाच्या डोळ्यावर टॉर्च का मारतात? कारण असं जे माहीत नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:28 IST2026-04-18T15:27:49+5:302026-04-18T15:28:27+5:30

Doctor Test Facts : जास्तीत जास्त लोकांना हेच वाटत असतं की, डॉक्टर डोळे चेक करत आहेत. पण मुळात डॉक्टर डोळ्यांच्या माध्यमातून थेट मेंदूची स्थिती चेक करत असतात.

Why do doctors shine a flashlight into a patient's eyes? know the real reason | डोक्याला जखम झाल्यावर डॉक्टर रूग्णाच्या डोळ्यावर टॉर्च का मारतात? कारण असं जे माहीत नसेल

डोक्याला जखम झाल्यावर डॉक्टर रूग्णाच्या डोळ्यावर टॉर्च का मारतात? कारण असं जे माहीत नसेल

Doctor Test Facts : दवाखान्यामध्ये डॉक्टर रूग्णांनी तपासणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यातील एक प्रकार म्हणजे डोळ्यावर टॉर्च मारणे. डोक्याला इजा झाली असेल, कुणी पडलं असेल किंवा अपघाताचा रूग्ण आला असेल तर डॉक्टर सगळ्यात आधी रूग्णाच्या डोळ्यावर टॉर्च मारतात. जास्तीत जास्त लोकांना हेच वाटत असतं की, डॉक्टर डोळे चेक करत आहेत. पण मुळात डॉक्टर डोळ्यांच्या माध्यमातून थेट मेंदूची स्थिती चेक करत असतात.

डोळ्यावर टॉर्च कशासाठी?

डोळ्यावर टॉर्च मारण्याच्या टेस्टला मेडिकल भाषेत Pupillary Light Reflex Test असं म्हणतात. डॉक्टर टॉर्चचा प्रकाश डोळ्यातील काळ्या भागावर म्हणजेच बुबुळांवर टाकता आणि बघतात की, बुबुळं किती वेगाने आकुंचन पावतात. असं करून डॉक्टर मेंदूच्या जखमेची माहिती मिळवतात. मुळात डोळ्यांच्या बुबुळांचा आकार आणि प्रकाशावर त्यांची प्रतिक्रिया ब्रेनस्टेमने नियंत्रित होते. जर डोक्याला झालेल्या जखमेमुळे मेंदूवर दबाव पडला, रक्ताची गाठ तयार झाली किंवा सूज आली असेल तर याने ब्रेनस्टेम प्रभावित होतात. असं झाल्यास बुबुळांच्या आकुंचनावर प्रभाव पडतो आणि यावरून डॉक्टरांना कळून येतं की, मेंदूत ब्लीडिंग आहे की नाही.

डॉक्टरांना काय दिसतं?

दोन्ही बुबुळं वेगाने आकुंचन पावत असतील तर मेंदू ठीक आहे. जर एक बुबुळ मोठं आणि एक स्थिर असेल तर त्या भागात मेंदूवर दबाव आहे. जर दोन्ही बुबुळं मोठी असतील आणि प्रकाशावर काहीही प्रतिक्रिया येत नसेल तर ब्रेनस्टेममध्ये गंभीर इजा असल्याचं कळतं. ही टेस्ट केवळ १० सेकंदात होते आणि डॉक्टरांना लगेच कळत की, रूग्णाला सीटी स्कॅन, न्यूरोसर्जन किंवा आयसीयूची गरज आहे की नाही.


डोक्याला जखम होणं फार मोठी  गंभीर बाब असू शकते. जर इजा झाल्याने ब्रेनस्टेम प्रभावित होत असतील तर प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. Pupillary light reflex सगळ्यात फास्ट न्यूरोलॉजिकल इंडिकेटर आहे.

Web Title : सिर में चोट लगने पर डॉक्टर आँखों में रोशनी क्यों डालते हैं?

Web Summary : डॉक्टर सिर में चोट लगने के बाद आँखों के माध्यम से मस्तिष्क की स्थिति की जाँच करते हैं। पुतली की प्रतिक्रिया से मस्तिष्क के तने की क्षति, रक्तस्राव और तत्काल देखभाल की आवश्यकता का पता चलता है। यह त्वरित परीक्षण तंत्रिका संबंधी समस्याओं को इंगित करता है।

Web Title : Why Doctors Shine Light in Eyes After Head Injury?

Web Summary : Doctors check brain status via eyes after head injuries using the Pupillary Light Reflex Test. Pupil reaction reveals brain stem damage, bleeding, and need for urgent care. This quick test indicates neurological issues.