शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

शरीर संबंधांसाठी 'तो' तब्बल ५६३ किमी चालत गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 3:34 PM

मेसेजिंग अ‍ॅपच्या माध्यमातून वाढवली मुलीशी ओळख

इंडियाना: एका अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी एक व्यक्ती तब्बल ५६३ किलोमीटर चालत गेला. मात्र तिथे गेल्यानंतर त्याला जोरदार धक्का बसला. अमेरिकेतील इंडियानात हा प्रकार घडला. इंडियानातील व्हाईटटाऊनमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षांच्या टॉमी ली जेन्किन्सची इन्स्टंट मेसेजिंग ऍपवरुन १४ वर्षांच्या कायलीशी ओळख झाली. त्यानंतर ली सतत कायलीशी चॅट करत होता. हळूहळू लीनं ओळख वाढवली आणि तो कायलीला कामेच्छा वाढवणारे मेसेज करू लागला. कायलीनंदेखील मेसेजला रिप्लाय दिले. त्यामुळे लीनं तिच्याकडे भेटायची इच्छा व्यक्त केली. मात्र आपण अतिशय दूर राहत असल्यानं भेटणं शक्य नसल्याचं तिनं ली याला सांगितलं. कायली विसकॉन्सिन भागात राहत असल्याची माहिती लीकडे होती. त्यामुळे त्यानं तिला भेटायची योजना आखली. त्यासाठी तो तब्बल ३५० मैल (५६३ किमी) चालत गेला. कायलीच्या घराच्या दिशेनं चालत असताना ली सतत तिच्याशी मेसेजच्या माध्यमातून बोलत होता. यावेळीही तो तिला उत्तेजना वाढवणारे मेसेज करत होता. आपण नेमके कुठे आहोत, याची माहितीदेखील तो मेसेज करून कायलीला देत होता. तब्बल ५६३ किलोमीटर अंतर चालून कायलीच्या घरी पोहोचलेल्या टॉमी ली जेन्किन्सला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर आपण ज्या मुलीशी बोलत होतो, ती व्यक्ती पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती ली याला मिळाली. इंडियानासह काही भागात अल्पवयीन मुलींना सोशल मीडिया, मेसेजिंग ऍपच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढळणाऱ्यांचं प्रमाण अतिशय मोठं आहे. त्यामुळे पोलिसांनी काही खोटी प्रोफाईल तयार करून अशा व्यक्तींना अटक करण्यास सुरुवात केली आहे.