शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस ! शेजारी राहणाऱ्या महिलेचे अंडरगारमेंट्स चोरी करत होता २५ वर्षी तरूण, कारण ऐकून पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:59 IST

Viral News : आधीतर घरातील लोकांना वाटलं की, कुणीतरी गंमत करत असेल, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा प्रकरण फारच गंभीर असल्याचं समोर आलं.  

Viral News : एकतर्फी प्रेमाच्या कितीतरी भयावह आणि विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. एकतर्फी प्रेमात लोक काय काय करतील याचा काही नेम नसतो. पण सध्या एकतर्फी प्रेमाच्या ज्या घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती फारच वेगळी आणि विचित्र आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील ही घटना असून इथे एक तरूणाने विकृतीचा कळसच गाठला. आधीतर तक्रारदार परिवारातील लोकांना वाटलं की, कुणीतरी गंमत करत असेल, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा प्रकरण फारच गंभीर असल्याचं समोर आलं.  

उज्जैनच्या ढाचा भवन परिसरात हा प्रकार घडला. येथील एका परिवाराला काही दिवसांपासून एका वेगळ्या समस्येचा सामना करावा लागत होता. घरातील महिला नेहमीप्रमाणे रोज कपडे घराबाहेरच्या दोरीवर वाळत घालत होती. पण दुसऱ्या दिवशी यातील काही कपडे गायब व्हायचे. बाकीचे कपडे तसेच रहायचे, पण महिलेचे अंडरगारमेंट्स गायब व्हायचे. आधी याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही. पण जेव्हा पुन्हा पुन्हा असं होऊ लागलं तेव्हा घरातील लोकांचा संशय वाढला. अशात त्यांनी घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज चेक केलं.   

सीसीटीव्ही फुटेजमध्ये परिवाराला दिसलं की, एक तरूण रात्री गुपचूप येतो, कुणी आजूबाजूला नाही याची खात्री करतो. त्यानंतर हळूच महिलेचे अंडरगारमेंट्स घेऊन तिथून निघून जातो. कुटुंबियांनी हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवलं. 

पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली आणि हा तरूण त्याच परिसरात राहणारा असू शकतो, असा त्यांनी विचार केला. त्यांना एका तरूणावर संशय देखील आला. ज्याचं नाव होतं अंकित मालविय. २५ वर्षीय अंकितला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हैराण झाले.   

चौकशीदरम्यान, त्याच परिसरात राहणाऱ्या या तरूणाने कबूल केलं की, तो एका विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करतो. तो बऱ्याच वर्षापासून या महिलेला पसंत करतो. याच आकर्षणाने त्याने हे विचित्र पाऊल उचललं. चौकशी करत असताना पोलिसांसमोर आणखी बाब आली की, आरोपी अंकितने आपल्या छातीवर महिलेच्या नावाचा टॅटूही काढला होता. हा आरोपी काही अनोळखी नव्हता. तो त्याच परिसरात राहणारा होता आणि तक्रार करणाऱ्या परिवाराचा तो शेजारी होता. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ujjain youth's bizarre obsession: Stealing neighbor's undergarments revealed.

Web Summary : A Ujjain youth, obsessed with his married neighbor, stole her undergarments. CCTV footage exposed the 25-year-old, who confessed his one-sided love and even had her name tattooed. He was arrested.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल