३ नातवंडे अन् ६३ वय असलेल्या या आज्जीची फिटनेस पाहून तरूणीही लाजतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 13:52 IST2019-08-23T13:45:58+5:302019-08-23T13:52:37+5:30

लेस्ली  मॅक्सवेल या मेलर्बनमध्ये राहणाऱ्या महिलेचं वय ६३ वर्षे. तिला तीन नातवंडेही आहेत.

63 year old grandmother fitness will amaze you she only date younger men | ३ नातवंडे अन् ६३ वय असलेल्या या आज्जीची फिटनेस पाहून तरूणीही लाजतील!

३ नातवंडे अन् ६३ वय असलेल्या या आज्जीची फिटनेस पाहून तरूणीही लाजतील!

लेस्ली  मॅक्सवेल या मेलर्बनमध्ये राहणाऱ्या महिलेचं वय ६३ वर्षे. तिला तीन नातवंडेही आहेत. पण आजही त्यांचं सौंदर्य, त्यांचा फिटनेस, फीगर पाहून तरूणीही लाजतील. लेस्ली या वयातही आठवड्यातून पाच दिवस एक्सरसाइज करते. इतकेच नाही तर या वयातही तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्स आहेत. ती स्वत: तर फिट राहतेच सोबतच दुसऱ्यांनाही फिट राहण्याचं ट्रेनिंग देते. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे ती तिच्यापेक्षा वयाने १० ते २० वर्षे लहान पुरूषांना डेट करते.

लेस्ली सांगते की, ती खूप खूश आहे. कारण बॉडी बिल्डींगने तिच्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. तिच्या नावावर ३० पेक्षा अधिक फिटनेस टायटल्स आहेत. पण ती आधीपासून अशी नव्हती. १५ वर्षांआधी तिचा घटस्फोट झाला होता. लेस्लीचे पती तिच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान होते. त्यावेळी लेस्लीचं वय ४८ होतं. त्यावेळीच तिने फिटनेसला आपलं लक्ष्य बनवलं.

जिम सुरू केल्यावर एका वर्षातच तिचं रूप बदलून गेलं होतं. ती सांगते की, 'पतीपासून वेगळी झाल्यावर माझ्या लाइफस्टाईलमध्ये फार जास्त बदल झाला. मला नेहमीच डेटिंगसाठी कमी वयाच्या पुरूषांनी अप्रोच केलं. एक्सरसाइज सुरू केल्यावर मला स्वत:त फार बदल दिसले आणि मला ते खूप आवडलं'.

लेस्ली दावा करते की, ती आजही मुलांपेक्षा अधिक फिट आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त वजन उचलू शकते. मला आई म्हणायची की, मुलांना मसल्स असलेल्या मुली आवडत नाही. पण मी आता हे म्हणू शकते की, असं काही नाहीये.

लेस्ली आता एक फिटनेस गुरू म्हणून लोकप्रिय आहे. फिटनेस आणि ग्लॅमरच्या दुनियेने तिला पूर्णपणे बदललं आहे. लेस्लीने तिच्या फिटनेस गुपितही जाहीर केलं. ती सांगते की, 'मी जंक फूड, तेल, तूपाच्या पदार्थांपासून दूर राहते. मी केवळ प्रोटीन आणि पौष्टीक आहार घेते. तसेच डेडलिफ्ट, स्क्वाट्स आणि अ‍ॅब्स माझ्या फेवरेट एक्सरसाइज आहेत'.

Web Title: 63 year old grandmother fitness will amaze you she only date younger men