मन्यारखेड्यात एकाच रात्री ४ घरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 13:16 IST2020-01-23T13:15:56+5:302020-01-23T13:16:25+5:30

नशिराबाद : येथून जवळच असलेल्या मन्यारखेडा शिवारात एम.आय.डी.सी. परिसरातील साई नगरात एकाच रात्री ४ घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोबाईलसह एकूण ...

Theft in one house in Manarekhedi overnight | मन्यारखेड्यात एकाच रात्री ४ घरात चोरी

मन्यारखेड्यात एकाच रात्री ४ घरात चोरी

नशिराबाद : येथून जवळच असलेल्या मन्यारखेडा शिवारात एम.आय.डी.सी. परिसरातील साई नगरात एकाच रात्री ४ घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोबाईलसह एकूण ३० हजार ५०० रूपयांची रोकड लांबविली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली.याबाबत सुनिल चरणसिंग चव्हाण (२७) यांनी तक्रार दिल्यावरून नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
एम.आय.डी.सी. मधील चटई कंपनीत कामास असलेले सुनिल चव्हाण व त्यांचे बंधू रवि चव्हाण यांचे ७००० रू. किमतीचा मोबाईल तसेच साईनगर भागातील अशोक बाबा घुले यांच्या भाड्याच्या खोलीत राहणारे संजय बापूलाल साहनी यांचे १५ हजार रुपए रोख, संजयकुमार शिवचंद महतो यांचे ५ हजार तसेच सुभाष सोपान अकोलकर यांचे १ हजार ५०० रू. रोख व मीरादेवी धनूराम यादव यांचे २ हजार रू. रोख असे २३ हजार ५०० रूपयांची रोकड व मोबाईलचे ७ हजार असे एकूण ३० हजार ५०० रूपयांची चोरी झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान नशिराबाद सह परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. स.पो.नि. प्रवीण साळुंखे, प्रवीण ढाके सहकारी तपास करीत आहेत.

Web Title: Theft in one house in Manarekhedi overnight