शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कजगावात पाणी प्रश्नावर रास्ता रोको

By admin | Updated: March 9, 2017 00:17 IST

२५ दिवसांनी नळाला पाणी : महिलादिनी महिलांनी हंडा डोक्यावर घेत केले आंदोलन

कजगाव : अनेक  दिवसापासून गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अनेक तक्रारी वीज वितरण कंपनीला करुनही हा प्रश्न सुटला नाही.  दिवसेंदिवस होत असलेल्या या त्रासाला कंटाळून अखेर जागतिक महिलादिनी ८ रोजी सकाळी साडेआठ वाजता गावातील महिलांनी हंडा डोक्यावर घेत रास्तारोको केला.  हे आंदोलन दोन तास सुरू होते. यामुळे वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला. अखेर तहसीलदार, पोलीस अधिकारी घटनास्थळी आल्यावर  या आंदोलनाची सांगता झाली. गत चार-पाच महिन्यापासून या पाणी योजनेला कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा पंप सुरु होत नाही. त्यामुळे कजगावचा पाणीपुरवठा बंद पडल्यासारखा आहे. कधीतरी पाणी येत असल्याने पाणी प्रश्न बिकट झाला आहे.  साधारणत: २५-३० दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गिरणा नदी भरभरुन वाहात आहे. तरीदेखील कजगावकर मात्र तहानलेले आहेत. तक्रारींकडे दुर्लक्षगेल्या महिन्यात ग्रा.पं. सदस्य अनिल महाजन व ग्रामस्थांनी लोणपिराचे येथे वीज वितरण कंपनी कार्यालयात वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले होते. नंतर भडगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालयालाही निवेदन दिले होते.  वीज कंपनी कार्यालयाकडून या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही.  त्यामुळे संतप्त महिला व ग्रामस्थांनी ८ रोजी रस्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. ८ रोजी सकाळी पावणेदहा वाजता गावातील महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन रस्ता रोको केला. हळूहळू आजूबाजूच्याही महिला सहभागी झाल्या. तसेच ग्रामस्थही या आंदोलनात आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.  कजगाव-चाळीसगाव, कजगाव-भडगाव, कजगाव-पारोळा, कजगाव-नागद हे चारही रस्ते बंद झाले होते. रस्ता रोकोबाबत  कळताच पोलीस प्रशासन व तहसीलदार, वीज वितरण कंपनी, पं.स. कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी आले. पोनि दत्तात्रय परदेशी, भडगावचे उपकार्यकारी अभियंता शर्मा, तहसीलदार सी.एम.वाघ यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेतली. महिला व ग्रामस्थांनी  २५-३० दिवसांनी पाणी मिळते. त्यामुळे होणाºया त्रासाबद्दल कैफियत मांडली. हा प्रश्न  आज न सुटल्यास येथून हलणार नाही असा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला. सायंकाळी ५वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे ठोस आश्वासन तहसीलदारांनी दिले. यानंतरच रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.  आंदोलन सव्वा अकरापर्यंत चालले. दीड तासापर्यंत झालेल्या आंदोलनामुळे विवाह समारंभाला जाणाºयांना याचा  फटका बसला. बीडीओची दांडीगावात पाणी प्रश्नासाठी रस्तारोको सुरू झाला आहे. याची माहिती मिळूनही भडगाव पं.स.चे गटविकास अधिकारी यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. ते आंदोलनस्थळी न आल्याने बराच वेळ त्यांच्याविरुध्द घोषणा दिल्या. ही बाब भ्रमणध्वनीद्वारे  त्यांना लक्षात आणून दिली. तरीही त्यांनी हजेरी लावली नाही. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्व.भरतसिंग पाटील यांची झाली आठवण बचुअप्पा यांनी कजगावच्या सरपंचपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली. कजगावकरांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी अनेक आंदोलने  गाजली. स्व.भरतसिंग पाटील यांचे आंदोलन हे गावाच्या  अडचणीसाठी असायचे.  त्यानंतर अनेक वर्षानंतर पाण्यासाठी कजगावकरांनी  दीड तास रस्ता रोको आंदोलन केले प्रसंगी प्रत्येक नागरिकांना स्व.भरतसिंग पाटील यांच्या आंदोलनाची आठवण होत होती.व्यापारपेठही बंदपाण्यासाठी रस्तारोको सुरू होताच कजगावच्या व्यापाºयांनी यात सहभाग घेत दुकाने बंद करुन पाठिंबा दिला. व्यापारपेठही बंद झाली. आंदोलन संपल्यानंतर ही दुकाने पूर्ववत सुरू झाली. वीज वितरण कार्यालयात बैठक या आंदोलनानंतर कजगाव वीज वितरण कार्यालयात अधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक  झाली.  कजगाव ग्रा.पं.ला कायमस्वरुपी  ग्रामविस्तार अधिकारी मिळावा अशी मागणी करण्यात आली. दोन दिवसात   गटविकास अधिकाºयांना पत्र देतो असे  तहसीलदार वाघ यांनी सांगितले.                                                      (वार्ताहर)८ मार्च रोजी देशभरात महिला दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. मात्र याच दिवशी कजगावच्या शेकडो महिलांना डोक्यावर हंडे घेऊन रस्ता रोको करावा लागला.महिला सरपंचांनी दिला राजीनामा  दरम्यान, कजगावच्या सरपंच लता निकम यांनी ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे.   त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की   गावात विविध विकास कामे  राबवित असतांना काही  सदस्य अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे विकास कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये  नाराजी आहे.