शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सात लाख रुपयांचा अपहार उघड

By admin | Updated: March 18, 2017 00:19 IST

बोदवड तालुक्यातील भारत निर्माण योजना : येवती येथील सरपंचांसह ग्रामसेवकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

बोदवड : तालुक्यातील  येवती ग्रामपंचायतीत भारत निर्माणीच्या पाणीपुरवठा योजनेत सात लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या मोठय़ा अपहारात येवती येथील  विद्यमान सरपंच व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम देवराम पाटील यांच्यासह ग्रामसेवक व माजी सरपंचावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे. माजी सरपंच यशोदाबाई रघुनाथ जंजाळ यांच्या कार्यकाळात येवती येथील भारत निर्माण योजनेत अपहार करून शासनाची फसवणूक करून सुमारे सात लाखांच्या शासकीय  निधीचा अपहार झाल्याचे येवती येथील निवृत्ती किसन वाघ यांनी केलेल्या तक्रारीत उघडकीस आले होते. त्यात तत्कालीन सरपंच आरोपी यशोदाबाई जंजाळ, विद्यमान सरपंच पुरुषोत्तम पाटील, तत्कालीन ग्रामसेवक संजय आधार कुमावत,  ग्रामसेवक विश्वनाथ प्रल्हाद तायडे यांनी संगनमताने भ्रष्टाचार        केल्याचे नमूद करीत 17 मार्च रोजी बोदवड पोलीस ठाण्यात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र सपकाळे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं.10/2017 भाग 5 भादंवि कलम 420, 467, 468, 471, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत   सरपंच पुरुषोत्तम पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.यांचा आहे आरोपींमध्ये समावेश..4तत्कालीन सरपंच आरोपी यशोदाबाई जंजाळ, विद्यमान सरपंच पुरुषोत्तम पाटील, तत्कालीन ग्रामसेवक संजय आधार कुमावत, तत्कालीन ग्रामसेवक विश्वनाथ प्रल्हाद तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बोदवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.भारत निर्माण योजनेतील अपहारमाजी सरपंच यशोदाबाई रघुनाथ जंजाळ यांच्या कार्यकाळात येवती येथील भारत निर्माण योजनेत अपहार करून शासनाची फसवणूक करून सुमारे सात लाखांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे येवती येथील निवृत्ती किसन वाघ यांनी केलेल्या तक्रारीत उघडकीस आले होते. पोलिसांचा तपास सुरूयेवती येथील ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल होताच येवती गावात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली. पोलिसांनी फिर्याद दाखल होताच गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींना अटक करण्याची कारवाई पोलीस करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.