शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

मोटर सायकल चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:37 IST

दुचाकी चोरून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देवीस मोटरसायकलीसह सहा आरोपींना अटक, कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विक्री
लोकमत न्यूज नेटवर्कधरणगाव : येथून जवळच असलेल्या बोरगावात पोलिसांना सुगावा लागताच मोटरसायकल चोरांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून २० मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.येथून जवळच असलेल्या बोरगावात जयेश पाटील नावाचा व्यक्तीजवळ एकच क्रमांकाच्या दोन मोटरसायकल असल्याची गुप्तवार्ता धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ पोलिस हेड काॅन्स्टेबल खुशाल पाटील, मोती पवार, दीपक पाटील, गजेंद्र पाटील, वसंत कोळी यांनी या ठिकाणी जाऊन खात्री केलेली संशयित मोटारसायकल त्या ठिकाणी मिळून आल्याने त्याबाबत या इसमास विश्वासात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. त्याने भूषण विजय पाटील (पळासखेडा सिम ता. पारोळा) याच्याकडून या मोटरसायकल घेतल्याचे कळले. त्याने अनेक लोकांना जुन्या मोटरसायकली विक्री केल्याचे समजले. मोटरसायकल देताना तो कागदपत्र नंतर देतो, असे सांगत असे. या माहितीवरून भूषणला चौकशीकरिता ताब्यात घेऊन सखोल माहिती हाती आली. त्याने मागील एक ते दीड वर्षात वेळोवेळी १० हजार रुपये प्रत्येकी देऊन ९ मोटरसायकली भूषण धनराज पाटील, अमोल नाना पाटील (दोन्ही रा. शनी मंदिर चौक, पारोळा) यांच्याकडून विकत घेऊन समोरच्यांना विक्री केल्याची कबुली दिली.त्यानुसार भूषण व अमोल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी चिंचपूरा. (धरणगाव), चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपूर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करून त्या भूषण विजय पाटील, जयेश रवींद्र चव्हाण. (जवखेडा ता. अमळनेर), ज्ञानेश्वर राजेंद्र धनगर (वर्डी ता. चोपडा), पंकज मधुकर खजुरे (राजीव गांधीनगर, पारोळा) यांच्यामार्फत सामान्य लोकांना विक्री केल्याचे समजले. यावरून सहाही आरोपींना धरणगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आले.पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, हेड काॅन्स्टेबल खुशाल पाटील, मोती पवार, दीपक पाटील, गजेंद्र पाटील, वसंत कोळी अशा धरणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने गुन्हे प्रकटीकरणसाठीचे काम कौशल्याने केले. या कारवाईत सहा आरोपींना अटक करून एकूण २० मोटरसायकल हस्तगत केली आहेत. मोटरसायकल चोरी करणारे व विक्री करणारे यांनी संगनमताने सामान्य लोकांना विशेषतः खेड्यातील लोकांना गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगून चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याची पद्धत अवलंबल्याचे समोर आले आहे. कोणीही नागरिकांनी विना कागदपत्र वाहन विकत घेऊ नये अशी वाहने चोरीची असल्याचे समजल्यानंतर पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते, असे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले.
टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीDharangaonधरणगावThiefचोरArrestअटक