शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोरं बांधून मजुराने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 1:06 PM

रावेर- रावेर तालुक्यातील खानापूर येथील शेतमजूर कैलास देवराम पाटील (वय-४७) यांनी गत परतीच्या अवकाळी पावसापासून हाताला काम नसल्याने संसाराचा ...

रावेर- रावेर तालुक्यातील खानापूर येथील शेतमजूर कैलास देवराम पाटील (वय-४७) यांनी गत परतीच्या अवकाळी पावसापासून हाताला काम नसल्याने संसाराचा रहाटगाडा हाकणे जिकरीचे ठरल्याने नैराश्यापोटभ थेट श्री कानिफनाथ महाराज देवस्थान मंदिरासमोरील हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोरं बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैर्वी घटना घडली. ही घटना गुरूवारी मध्यरात्री १२़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली आहे़कैलास पाटील हे खानापूर येथे पत्नी व मुलांसह वास्तव्यास होते़ शेतमजुरी करून ते आपल्या संसाराचा रहाटगाडा हाकत होते. दुदैर्वाने, परतीच्या अवकाळी पावसाने तिघांच्याही हाताला काम नसल्याने, आज कमवाल तर उद्या भाकरीचा चंद्र दिसेल.. अशा विदारक परिस्थितीत संसारातील अडचणींचा ताण आल्याने नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैर्वी घटना घडली. यावेळी त्यांनी श्री कानिफनाथ महाराज देवस्थानच्या हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोर बांधून गळफास घेत जीवनयात्रा संपविली़ याप्रकरणी विकास मोतीराम पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ एन डी महाजन व डॉ श्रीमती स्वप्निशा पाटील यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव