शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम भगति संतन कर संगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 22:26 IST

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची ...

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची असो प्रत्येक जण गोष्टीतून सुख शोधत आहे आणि ते सुख जर कलियुगात प्राप्त करायचे असेल तर एकच साधन ते म्हणजे भक्ती. चार युगे झाली त्यातील सतयुगात सगळीकडे आनंदी आनंद होता त्यानंतर त्रेतायुगात प्रभुश्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने सगळीकडे सुख समाधानाने लोक जीवन जगत होते त्यानंतर द्वापारयुगामध्ये युगामध्ये श्रीकृष्णाचा वास असल्याने सगळीकडे प्रेमाचा भरणा होता. सगळीकडे लोक आयुष्य प्रेमाने जगत होते.आपल्याला जर सुख मिळवायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे ईश्वरभक्ती. ईश्वराची भक्ती करायची तर कशी करायची तर नवविधा भक्ती सांगितली आहे. त्यात सर्वात प्रथम भक्ती म्हणजे श्रवणभक्ती. भागवत श्रवण करून राजा परीक्षितीच मरण माघारी गेलं इतकी ताकद श्रवण भक्तीत आहे. पण ही भक्ती करण्यास आपल्याला अवघड जाईल म्हणून सर्वात सोपी भक्ती सांगितलेली आहे नामभक्ती. भूतलावर जन्म घेतल्यावर भगवंताला प्राप्त करायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे नामभक्ती.जेव्हा सीतामातेचे रावणाने हरण केले होते तेव्हा सीतामतेला आणण्यासाठी सेतु पुल तयार करावा लागला तेव्हा नुसत्या प्रभुश्रीरामचंद्रांच्या नावाने दगडे तरली होती निर्जीव वस्तूला तारण्याची ताकद नामात आहे. आपल्यालाही हा संसाररूपी भवसागर तरून जायचा असेल तर नाम भक्ती करायला पाहिजे.राम आणि कृष्ण ही दोन्ही नावे घेऊन ईश्वराचे नामस्मरण करायला हवे या दोन्ही नामाने निश्चित मानव भवसागर तरुन जाईल. वाल्या कोळीने नाम भक्ती केली तर त्यांची वाल्मिकऋषी म्हणून ख्याती मिळवली, हे फक्त नामामुळेच शक्य झाले. नामभक्ती करून आपल्या जीवनात आनंदप्राप्ती करायला पाहिजे यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करून आपण जीवन सार्थकी लावू या...- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव