शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे तात्काळ राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्यावतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय मासूने शाळा सुरू करण्यासंदर्भात पर्यायही सुचविले आहेत.

कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यानंतर गत वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. केवळ कोरोनामुक्त गावांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू असून दुसरीकडे शहरातील शाळा, महाविद्यालये अजूनही उघडलेली नाहीत. दरम्यान, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नाही. परिणामी, या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. वर्षभरापासून विद्यार्थीसुध्दा घरात राहून कंटाळले आहेत. जर शिक्षण व्यवस्था अशीच बंद राहिली तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळासुध्दा सुरू व्हाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

असे सुचविले पर्याय़..

- शाळा व महाविद्यालयातील एका वर्गात शंभर टक्के हजेरीपट असेल तर सकाळ सत्रामध्ये पन्नास टक्के विद्यार्थ्यांना बोलविण्यात यावे तर दुपारच्या सत्रात निम्म्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात यावे.

- शाळा आणि महाविद्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला सुरुवात करावी. जेणेकरून हळूहळू लसीकरणाचा टप्पा गाठून शाळा व महाविद्यालये १ डिसेंबरपासून पूर्णपणे सुरू करू शकतो.

- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांना कोरोनाचे सर्व नियम पाळून महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर यावर उपाय काढून शाळा व महाविद्यालय त्वरित सुुरू करावीत. अन्यथा मासू सरकारविरोधात न्यायासाठी बंड पुकारून रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे.