शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

विवस्त्र करुन २८ विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 19:03 IST

जळगावच्या इकरा युनानी महाविद्यालयातील प्रकार : तीन विद्यार्थ्यांची हकालपट्टी

जळगाव : सिनियर विद्यार्थ्यांकडून २८ विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगिंग करीत त्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगावच्या इकरा युनानी महाविद्यालयात उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची महाविद्यालयातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.मुदस्सर मुख्तार इनामदार ( १९, रा.परभणी) या विद्यार्थ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्याला शासकीय कोट्यातून शहरातील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शुक्रवारी मुदस्सर याला पालकांनी वसतिगृहात दाखल केले. यानंतर शनिवारी त्यांच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या रुममध्ये होते. यावेळी १५ ते २० सिनीयर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.सिनेमातील पात्र करायला लावलेमुदस्सर याने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजता काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्या प्रमाणे अ‍ॅक्टिंग करण्यास सांगून नंतर एकेक विद्यार्थ्यांची ओळख-परेड घेतली. यावेळी मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळ देखील केली. त्याने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. तसेच खिशातील १८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्यास सांगितले, अन्यथा हीच ट्युबलाईट अंगावर फोडू, असे धमकावण्यात आले. हा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सर याने हॉलमधून पळ काढत स्वत:ची सुटका करुन घेतली.सुरक्षा रक्षकाच्या मदतीने साधला वडीलांशी संपर्करॅगिंग करणाऱ्यांपासून सुटका केल्यानंतर मुदस्सर याने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पालकांना फोन करुन माहिती दिली. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. प्राचार्य डॉ.शोएब शेख यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुदस्सरचे वडील मुख्तार इनामदार व भाऊ डॉ़ मुजक्कीर हे महाविद्यालयात पोहचले. महाविद्यालयाने घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. दरम्यान, मुदस्सर याचा मोबाईल व रोख रक्कम काही जणांनी लांबविला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.राष्ट्रीय अ‍ॅन्टी रॅगिंंग समितीकडे तक्रारमुदस्सर याने पहाटे ३.४४ वाजेच्या सुमारास दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे मेलव्दारे तक्रार केली. रविवारी सकाळी ८.५१ वाजता तक्रारीची नोंदणी झाल्याचा मेल आला. अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडून तक्रारीची दखल घेवून महाविद्यालयास कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले़यादरम्यान प्राचार्यासह पालकांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणेही गाठले होेते. राष्ट्रीय अँन्टी रॅगींग समितीच्या सुचनेनुसार प्राचार्य डॉ. शेख यांनी विद्यालयाच्या कार्यालयात सर्व २८ मुलांचे लेखी जबाब नोंदवून घेतले.उर्दूतून दिला अहवालमहाविद्यालयात घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी मुदस्सर यांच्यासह वडील व भाऊ यांनी रविवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल सुध्दा त्यांच्याकडे होता़ परंतु, अहवाल हा उर्दू भाषेत असल्यामुळे तो मराठीतून आणवा व नंतर तक्रार दाखल करून चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले़ त्यामुळे मुदस्सर हा कुटूंबासह पुन्हा महाविद्यालयाच्या दिशेने परतला. दरम्यान, या प्रकाराची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरूंकडेही तक्रार करण्यात आली आहे़मुदस्सरचे वडील परभणी येथे होमगार्ड समादेशक म्हणून कार्यरत आहेत.महाविद्यालयात झालेला रॅगिंंगचा प्रकार चुकीचा आहे़ विद्यार्थ्याच्या सांगण्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली त्या तीन विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे़ याबाबत संबंधित विद्यार्थ्याने पोलिसात व अ‍ॅन्टी रँगिंग समितीकडेही तक्रार केली असून प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.- डॉ़ करीम सालार, संस्थापक अध्यक्ष, इकरा संस्था 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव