कुंदन पाटील, जळगाव : भुसावळ नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांचे जात प्रमाणपत्र येथील जातपडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. त्यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद धोक्यात आले असून भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव होते. एकुण ८ उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले.
या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गायत्री चेतन भंगाळे यांनी एक हजार ८४७ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर रजनी सावकारे, संजय तायडे, राहुल तायडे आणि प्रमोद सावकारे यांनी गायत्री भंगाळे यांनी भंगाळे यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्यात भंगाळे यांनी निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्र मिळवताना नियमांचे पालन केले नाही आणि त्यांचे नातेवाईक मूळचे उत्तर प्रदेशातील महुबा जिल्ह्यातील असल्याचा दावा करण्यात आला होता.
त्यानुसार अनुसूचित जाती (एससी) आरक्षणासाठी पात्र ठरत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोंदार्डे यांच्या समितीने गुरुवारी सुनावणी केली. त्यानुसार भंगाळे यांनी सादर केलेले जातप्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यवाही सुरु
दरम्यान, जातपडताळणी समितीने भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राचा अहवाल जिल्हाधिकारी, तक्रारदार यांच्यासह नगराध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर गायत्री भंगाळे यांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उच्च न्यायालयाने अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती न दिल्यास भुसावळकरांच्या बोटांना पुन्हा एकदा शाई लागण्याची शक्यता आहे.
Web Summary : Gayatri Bhangale, Bhusawal's Nationalist Congress mayor, had her caste certificate invalidated. This puts her position at risk after defeating a BJP minister's wife. Allegations arose that Bhangale's caste certificate was obtained improperly, questioning her eligibility for the reserved seat. An inquiry deemed the certificate invalid, prompting potential disqualification proceedings.
Web Summary : भुसावल की राष्ट्रवादी कांग्रेस की मेयर गायत्री भंगाले का जाति प्रमाण पत्र अवैध घोषित। भाजपा मंत्री की पत्नी को हराने के बाद पद खतरे में। भंगाले के जाति प्रमाण पत्र पर अनियमितता के आरोप, आरक्षित सीट के लिए पात्रता पर सवाल। जांच में प्रमाण पत्र अवैध, अयोग्यता कार्यवाही शुरू।