शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

"ओबीसी आरक्षणाने न्याय मिळतो, हे सांगणारे जरांगेंचे सल्लागार कोण?"; लक्ष्मण हाकेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 14:01 IST

वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव बेमुदत उपोषणाच्या सातव्या दिवशी राज्यभरातून दुचाकी, चारचाकी रॅली वडीगोद्री येथे दाखल होत आहेत.

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : मनोज जरांगे हे जी बाजू मांडत आहेत त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे, ओबीसी आरक्षण मिळाल्यावर आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला न्याय मिळतो हे सांगणारे जरांगेचे सल्लागार कोण आहेत? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद दरम्यान केला. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे गेल्या सात दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावसाठी बेमुदत उपोषण करत आहेत. दोघांचीहि प्रकृती सध्या खालावलेली आहे.

महाराष्ट्रात शासनाने आतापर्यंत आमच्या आंदोलनाची दखल घ्यायला हवी होती. आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत, आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत. म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही. पण माय बाप सरकार, ओबीसी ची भाषा समजून घ्या, आमची दखल नका घेऊ पण व्हीजेएनटी,  ओबीसींची बाजू काय आहे हे तरी समजून घ्या, अशी विनंती हाके यांनी केली.

आरक्षण गरीबी हटाव कार्यक्रम नाहीगरजवंत मराठा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो हे कोणी सांगितले. मायबाप सरकार समजून घ्या आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. कुणबी आणि मराठा वेगळा, त्यांचे आचार विचार वेगळे असल्याचे हाके यांनी सांगितले.

पुन्हा धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेधवडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव बेमुदत उपोषणाच्या सातव्या दिवशी राज्यभरातून दुचाकी, चारचाकी रॅली वडीगोद्री येथे दाखल होत आहेत. आज उपोषणार्थी दोघांचीही प्रकृती पुन्हा खालवल्याने संतप्त ओबीसी बांधवांनी मंगळवारी दुपारी धुळे ते सोलापूर महामार्गावर रास्तारोको केला. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचा निषेध करत टायर जाळलले होते. यानंतर आज पुन्हा एकदा बुधवारी उपोषणार्थी यांना ना भेटीसाठी आलेल्या काही संतप्त आंदोलकांनी पंधरा मिनिटे त्याच ठिकाणी रास्ता रोको करत टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जमाव पांगवला. रस्त्यावर जाळलेले टायर बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :JalanaजालनाOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlaxman hakeलक्ष्मण हाके